LOKSANDESH NEWS
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्व. वितरण व नवीन-अक्षय ऊर्जा केंद्रीय मंत्री (भारत सरकार) प्रल्हाद जोशी यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले.
यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, यांच्या हस्ते केंद्रीय मंत्री मंत्री श्री जोशी यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. यावेळी माजी खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी,माजी आमदार प्रशांत परिचारक, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके,तहसीलदार सचिन लंगुटे, यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली