तरुण भारत स्टेडियमसमोरआज सकाळी एक तीन चाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली.
तरुण भारत स्टेडियमसमोर माहेश्वरी चौकात आज सकाळी एक तीन चाकी रिक्षा आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघात इतका जोरदार होता की रिक्षाचे पुढील भाग पूर्णपणे निकामी झाला. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन रिक्षाचालकाला रुग्णालयात पोहोचवले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. यामुळे काही वेळ वाहतूक कोंडीही निर्माण झाली.
सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा सुरू आहे. नेमका अपघात कशामुळे झाला याबाबत तपास सुरू आहे. चारचाकी वाहनचालकाने वाहनाचा वेग न जपल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली