रस्त्याचे बांधकाम न करता आज माजी आमदार आंदोलन करीत असल्याचा, आमदार संजय पुराम यांचा आरोप
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा हा नक्षल प्रभावित विधानसभा म्हणून ओळखले जाते. आजही या भागामध्ये अनेक रस्त्यांचे बांधकाम झाले नाही. अनेक रोड रस्ते हे नादुरुस्त आहेत. अशातच देवरी येथील डवकी ते पुराडा आणि चिचगड ते सुंदरी फाटा हा मार्ग गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित आहे. यापूर्वी जे आमदार होते सहसराम कोरोटे त्यांनी विधानसभेमध्ये कोणतेही रोड रस्त्याचे बांधकाम केले नाही.
असा आरोप आमदार संजय पुराम यांनी केला आहे. तर 2014 ते 2019 या काळामध्ये मी जेव्हा आमदार होतो या भागामध्ये रोड रस्त्याची अनेक काम केली परंतु पराभव झाल्याच्या नंतर मी काम करू शकलो नाही. परंतु आता मी आमदार झाल्यामुळे डवकी ते पुराळा आणि चीचगढ ते सुंदरी फाटा हा मार्ग नव्याने मी मंजूर केलाय.
मात्र माजी आमदार सहसराम कोरोटे हे आमदार असून त्यांनी एकही रोड रस्त्याचे काम केलं नाही आणि आज ते रस्त्यासाठी आंदोलन करीत आहेत अशी टीका त्यांनी माजी आमदार सहसराम कोरोटे यांच्यावर केली आहे त्यामुळे पुन्हा एकदा आजी आणि माजी आमदार यांच्यात श्रेय वादाची लढाई आमगाव देवरी विधानसभेमध्ये दिसून येत आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली