आंबोली दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

आंबोली दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला....



आंबोली दरीत कोसळलेल्या युवकाचा मृतदेह सापडला....

लोकसंदेश कोल्हापूर प्रतिनिधी

आंबोली कावळेसाद पॉईंट येथील दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र सनगर( 45) या पर्यटकाचा मृतदेह सापडला असून आज एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक, सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दीडशे फूट खोल दरीतून हा मृतदेह काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचा मृतदेह आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. कोल्हापूर येथून आंबोली येथील वर्षा पर्यटनासाठी जिल्हा परिषदेचे कर्मचारी आले होते. यावेळी सायंकाळी ते कावळेसाद पॉईंट येथे गेले असता राजेंद्र सनगर हे फोटो काढीत असताना खोल दरीत कोसळले. अखेर अथक प्रयत्नानंतर सनगर यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मूळचे पन्हाळा तालुक्यातील माले येथील आणि सध्या राहणार, चिले कॉलनी येथील राहणारे राजेंद्र बाळासो सनगर, हे त्यांच्या 14 सहकाऱ्यांसोबत आंबोली इथं वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. कावळेसाद पॉईंट येथे रोलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरल्याने ते दरीत कोसळले. लागलीच गेळे गावचे सरपंच सागर ढोकरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती.


याबाबत धक्कादायक माहिती असे समोर येतेय की..
या पर्यटन ठिकाणी उलटे वारे वाहत असल्यामुळे त्यांचा रुमाल खाली पडला आणि तो उचलण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते खाली कोसळल्याचे समजून येत आहे...


सायंकाळी उशिरापर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. त्यानंतर शनिवारी दुपारी मृतदेह सापडला आहे.
घटनेची माहिती मिळताच आंबोली दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल मनीष शिंदे आणि इतर पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. त्यांच्या अथक परिश्रमानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ 
सांगली.
_______________________________________

                 सावधानतेचा इशारा..
सर्व नागरिक व पर्यटकांना सावधान करण्यात येत आहे की,
सद्यस्थितीला पावसाचे दिवस आहेत.. साहजिकच आहे पर्यटनासाठी आपल्या कुटुंबीयांसोबत आपण वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनास जात असतो .. परंतू पर्यटनाच्या ठिकाणी धबधबे, तलाव, नदी, निसर्ग, डोंगर कपारी अशा ठिकाणी जाताना आपण सावधानता बाळगणे गरजेचे आहे..
आपली एकच छोटी चूक आपल्या  जीवाशी व आपल्या कुटुंबास खाईत लोटणारी ठरू शकते..
तरी सर्वांनी पर्यटन व इतर ठिकाणी जाताना कोणतेही आवसानघातकी काम करू नये... आपल्या व कुटुंबासह सावधानगी बाळगावी अन्यथा  आपल्यासह आपल्या कुटुंबीयास त्याचा त्रास जीवनभर सहन करावा लागेल ...

सलीम नदाफ;  संपादक लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हट लिमिटेड मुंबई सांगली.
8830247886