१९६० साली कोयना जलविद्युत प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर होते. या प्रकल्पाचे आँफीस कराडला होते. या आँफीसमध्ये मी नोकरी मिळविली.
नोकरी करीत करीत मी १९६२ साली डिप्लोमा पास झालो.
सातारला इंटरव्ह्यूला बोलावलं. नेमका पाऊस आला. कमिटीचे लोक पाच, सहा ठिकाणी बसलेले. मुलाखत देताना मी म्हटलं मला हडपसरला पार्ट टाईम नोकरी पाहिजे, शिकायचं मला."नोकरी पार्टटाईम कशाला म्हणता? फुलटाईम झाला तर १३० रुपये पगार मिळेल. पार्ट टाईम असेल तर ७० रुपये मिळेल, " असे मुलाखत घेणाऱ्यांनी मला सांगितले.
माझ्या आयुष्यातला पहिला आनंद म्हणजे ज्यादिवशी माझ्या गावी पोस्टाने आँर्डर आली. पत्र फोडल्यानंतर पाहिलं की, माझी पार्टटाईम शिक्षकाची आँर्डर आली. हडपसरला जाँईन झालो.
सकाळी कॉलेजला जात असे. दुपारी शाळा करायची.
शाळेतच सायन्सच्या टेबलावर झोपायचो. तिथच राहायचो.
१०,में १९६४ साली भारती विद्यापीठाची स्थापना केली. आपल्या सेवकांना शनिवारवाड्यावरील भेळ, शेंगा खाण्यासाठी बरोबर घेऊन जात. ऑफीसमध्ये एका बाजूला पार्टीशन करुन त्या छोट्याश्या खोलीत राहू लागलो.
सोनसळहून पुण्याला येणाऱ्या एसटीतील जेवणाच्या डब्याला मी कधीच विसरलो नाही.
बॅटरी सारखी पेटी तयार करून विद्यार्थ्यांसाठी जेवणाच्या डब्याची सोय केली होती.
दररोज गावाकडून येणाऱ्या एसटीची मी रस्त्यावर उभं राहून जेवणाच्या डब्याची वाट पाहात बसायचो.
एखाद्यावेळी जेवणाचा डबा आला नाही तर मी शिळी भाकरी चटणीबरोबर खात होतो.
माझ्या घरच्या परीस्थितीच्या जाणीवतेमुळेच आणि माझ्या भागात पडणारा दुष्काळ मला पहावत नसे भागातील मुलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, गोरगरीबांची /बहुजनांची मुलं शिकून मोठी व्हावीत यासाठीच भारती विद्यापीठ एक मोठं विश्वविद्यालय झालं आहे.
इच्छा असली की मार्ग सापडतो.
डॉ. पतंगरावजी कदमसाहेब
संस्थापक, भारती विद्यापीठ कुलपती, भारती विद्यापीठ विश्वविद्यालय पुणे,
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.