SANGLI: गुजरात सरकारने नुकतीच बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली.... निषेधार्थ आंदोलन आंदोलन

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

SANGLI: गुजरात सरकारने नुकतीच बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली.... निषेधार्थ आंदोलन आंदोलन




SANGLI/MIRAJ
लोकसंदेश प्रतिनिधी मिरज

गुजरात सरकारने नुकतीच बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांची शिक्षा माफ करून त्यांची सुटका केली आहे,

 त्याचप्रमाणे राजस्थान मध्ये नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी घटनेत एका बालकाचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रांतांना निवेदन घेऊन तीव्र निषेध व्यक्त केला.....

बिल्कीस बानो प्रकरणातील सर्व गुन्हेगारांची सुटका तत्काळ रद्द करा व त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करा, त्याचसोबत राजस्थान मध्ये घडलेल्या दुर्दैवी
घटनेतील दोषी जातीयवादी शिक्षकावर देखील कडक कायदेशीर कारवाई करावी.



१) राजस्थान मधील जालोर जिल्ह्यातील सुराना गावातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षीय दुलीत समाजातील इंद्रकुमार मेघवाल नावाच्या
विद्यार्थ्याने माठातील पाणी पिले, त्यामुळे ते पाणी दूषित झाले असे समजून चैल सिंग नावाच्या धर्माध व जातीयवादी शिक्षकाने त्या विद्यार्थ्यास इतकी बेदम मारहाण केली की त्यात त्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.




सन २००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या भीषण दंगलीमध्ये बिल्कीस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिच्या डोळ्यादेखत तिच्या ३ वर्षाच्या लहान बाळाचा व कुटुंबातील १३ सदस्यांचा अत्याचार करून खून/ हत्या करण्यात आली.त्यातील फक्त ७ मृतदेहच सापडले.सदर घटनेतील सर्व आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली होती.



अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमत्त म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी एकीकडे संपूर्ण देशातील जनता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना त्याच दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी गुजरात सरकारने सदर घटनेतील सर्व आरोपी कैद्याची शिक्षा माफ करून त्यांना सोडून दिले आहे. याचाच अर्थ असा होतो की गुजरात सरकार हे संविधान विरोधी आहे की काय? त्यामुळे असे गंभीर गुन्हे करण्यासाठी आरोपी गुन्हेगारांना एक प्रकारचे उत्तेजन व अभय गुजरात सरकार देत आहे काय ?
राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीच्यावतीने या दोन्ही अमानवीय घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला व मा. मिरज प्रांतासो समीर शिंगटे साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जैलाब शेख,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मिरज तालुका महिला आघाडीचे जुबेदा मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला आघाडीचे मिरज तालुका सदस्य कौसर संधी,राष्ट्रीय मुस्लिम सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवकुमार कांबळे,सामाजिक कार्यकर्त्या सो. लतिफा शेख,समाजवादी पार्टीचे मिरज तालुका अध्यक्ष सलीम आत्तार,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्याक आघाडीचे एजाज मुजावर,स्वप्नील पाटील,अन्वर शेख,साद गवंडी,जमीर शेख,इकबाल मुजावर,अनिरुद्ध माळी ,नाझीम मणेर,मोहसीन हंगड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.मिरज प्रांताद्वारे प्रधानमंत्री यांना निवेदन पाठवलेले आहे. तरी रितसर आमचे म्हणणे केंद्र सरकारला कळवावे अशी मिरज प्रांताकडे मागणी केलेली आहे


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली