LOKSANDESH NEWS
काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याणमध्ये उपोषण
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज कल्याण पश्चिमेतील पारनाका येथे नागरिकांनी उपोषण सुरु केले आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत हे उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी दहशतवादी हल्ल्याचा नागरिकांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली