लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे- प्रकाश आबिटकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे- प्रकाश आबिटकर


लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे- प्रकाश आबिटकर


On महात्मा फुले कारवाई

• महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल आम्ही केले आहेत

• त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे

• पुढील एक महिन्यांमध्ये या योजनेतील आर्थिक मदतीमध्ये वाढ केली जाणार आहे

• या योजनेत एकही रुपया पेशंटकडून घ्यायचा नाही

• मात्र दुर्दैवाने काही हॉस्पिटल पेशंट कडून पैसे घेत असल्याचं समोर आलं आहे

• तशा काही तक्रारी आल्या होत्या

• अशा तक्रारीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

• कोल्हापूर मध्ये चार हॉस्पिटल वर अशी कारवाई झाली आहे

• आता राज्यात देखील ही कारवाई सुरू होईल

On हॉस्पिटल मनमानी 

• शासनाच्या यंत्रणेने योग्य नियंत्रण ठेवलं तर आपोआप हॉस्पिटल चांगलं काम करावे लागेल

• गेल्या पाच वर्षात १००७ तक्रारी या योजना संदर्भात आणि हॉस्पिटल संदर्भात आल्या होत्या

• आता हॉस्पिटल मधील बेडची उपलब्धता मोबाईल ॲप द्वारे देखील लोकांना मिळणार आहेत 

• शिवाय हॉस्पिटल बाबतची तक्रार देखील ऑनलाइन पद्धतीने नातेवाईकाला देता येणार आहे

• आता पेशंट किंवा नातेवाईकांकडून ऑनलाईन आलेली तक्रार थेट आरोग्य विभागाला येईल

On राष्ट्रवादी CM सत्कार

• राष्ट्रवादी अजित पवार गटाने घेतलेल्या या कार्यक्रमामागील भावना आणि उद्देश चांगली आहे

• सगळ्या माजी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण सुद्धा त्यांनी दिली आहेत

• उपस्थित राहायचं की नाही हा त्या त्या राजकीय पक्षाचा प्रश्न आहे

• चांगला विषय त्यांनी घेतला आहे असे विषय घेतले पाहिजेत

On के. पी. पाटील 

• मुंबईवरून आजच आलो याबाबत मला माहिती नाही.

On अजित पवार मुख्यमंत्री इच्छा

• राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं.

अजित पवार तर त्या पक्षाचे नेते आहेत. त्यांना असं वाटणं यात गैर काहीच नाही.

On लाडकी बहीण परिणाम

• लाडकी बहीण योजनेमुळे सर्वच खात्यांना निधीच्या बाबतीत कसरत करावी लागत आहे

• त्यामुळे या बजेटमध्ये ज्या पद्धतीची निधीची उपलब्धता इतर विभागांना व्हायला हवी होती ती झाली नाही

• यामुळे आमच्या सर्वांचीच थोडीशी अडचण झाली आहे

• पहिल्या टप्प्यात काही धावपळ झाली आहे आता गाडी रुळावर येईल

• लाडकी बहीणच नाही तर ज्या ज्या योजना दिल्या आहेत त्यासाठीच्या निधीची उपलब्धता पुढच्या टप्प्यात होईल

On महायुती इलेक्शन 

• राज्यात महायुतीचे सरकार आला आहे त्यामुळे जिल्ह्यात देखील सर्वच क्षेत्रातल्या निवडणुका एकत्रित लढवन अपेक्षित आहे

• सहकाराच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील आम्ही एकमेकांच्या समन्वयानं लढलो. तर राज्याचे चित्र दिसलं ते जिल्ह्यात देखील दिसेल

On नमामी पंचगंगा प्रोजेक्ट

• पंचगंगा प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहेच.

• प्रदूषण थांबवण्यासाठी नमामी पंचगंगा योजनेच्या आराखड्याची आणि निधीची तरतूद होईल

• त्यामुळे आता या आराखड्याच्या कामाची सुरुवात होणे गरजेचे आहे

• केवळ कागदावर नाही तर हे काम आता प्रत्यक्षात सुरू होण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री म्हणून स्वतः यामध्ये लक्ष घालणार आहोत.

On अलमट्टी 

• अलमट्टीच्या उंची वाढवण्याला महाराष्ट्र राज्य सरकारचा विरोध आहे हे आपण केंद्राकडे स्पष्टपणे सांगितलं आहे

• अलमट्टी मुळे सांगली आणि कोल्हापूरला सर्वाधिक फटका बसणार आहे

• जर कर्नाटक सरकार अशा पद्धतीने वकील आणि जलतज्ञांची फौज उभा करत असेल

• तर आम्ही देखील त्या विरोधात तशीच वकिलांची आणि जलतज्ञांची फौज उभा करू

• अलमट्टी उंची वाढी विरोधात कायदेशीर दृष्ट्या जे जे करावे लागेल ते आम्ही करू

On मान्सून आढावा बैठक

• या दरवर्षीपेक्षा जास्त पाऊस पडणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे

• पुढच्या आठ दिवसात कृषी विभाग आणि महापूर नियंत्रणा संदर्भात देखील बैठका होतील

• महापूर रोखण्यासाठी ज्याच्या उपाययोजना करावा लागतील त्या केल्या जातील

• अलमट्टी मधील पाणी विसर्ग बाबत सध्या दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू आहे

• एका बाजूला कायदेशीर कारवाई करूच मात्र महापूर येऊ नये यासाठी दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि सांगलीचे आम्ही पालकमंत्री समन्वय ठेऊन काम करत आहोत 

• महापुराचा फटका दोन्ही जिल्ह्यांना बसू नये याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतोय.



लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली