नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
नांदेड जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यात 14 टँकर सुरू असून, 40 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रकल्पात 13 टक्के जास्त पाणीसाठा असला तरी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा अस आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
- अवैधपणे खत विक्री होत होती. त्यावर आम्ही कारवाई केली आहे. कापूस आणि सोयाबीनच्या बियाण्यांची पुरेसे उपलब्धता होईल याचे नियोजन आम्ही केले आहे. तसेच खतासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांला सक्ती करू नये, असे आवाहन सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी खत कंपन्यांना केले आहे.
- नमुख्यमंत्र्यांनी ठरवून दिलेल्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात नांदेड जिल्ह्याचा राज्यातून पाचवा क्रमांक आला आहे. त्यामुळे टीमला अधिक काम करण्यासाठी मोटिवेशन मिळाल आहे भविष्यात सुद्धा चांगलं काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली