मिरज शहर अन्य भागास अपुरा पाणी पुरवठा होणार
उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करावा असे अहवान कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा यांनी केले आहे
मिरज कृष्णा नदी घाट परिसर वरून जाणाऱ्या मिरज पाणी पुरवठा करण्यात येणारी रॉ वॉटर 711 डायमीटर रायझिंग मेन लाईन दोन ठिकाणी लिकेज झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
सदर ठिकाण लिजेज मुळे पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी मिरज जल शुद्धीकरण केंद्र येथे पाणी पुरवठ्याचा डिस्चार्ज कमी प्रमाणात होत आहे.
मिरज परिसरात टाक्या भरण्यासाठी उशिरा होत असल्याने मिरज व अन्य भागात अपुरा पाणी पुरवठा होणार आहे.
सदरचे लिकेज काढून घेण्यासाठी उद्या दिनांक१३/५/२०२५ रोजी कामगिरी हातात घेतली जाणार आहे. त्या बाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी सहकार्य करावे ,उपलब्ध पिण्याचे पाणी काटकसरीने वापर करावा, असे अहवान कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग यांनी केले आहे,
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई./ सांगली.