मी झाले शुद्ध शाकाहारी अन् खाते मिळाले मांसाहारी, कुठेही गेले तरी लोक कोंबडे खा, मासे खा म्हणतात!पंकजा मुंडेंनी जाहीर भाषणात सांगितली अडचण
- मी शुद्ध शाकाहारी झाले आणि खाते मिळाले मांसाहारी.. कुठेही गेले तरी लोक म्हणतात कोंबडे ट्राय करा.. मासे ट्राय करा, माझी परेशानी होते. शाकाहारी नसलेला माणूस शाकाहारी झाल्यानंतर अशा प्रकारचे पदार्थ समोर आल्यानंतरही मी केवळ भाजी उचलते.. असे म्हणत राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली होणारी अडचण जाहीर भाषणात सांगितली.
बीडच्या परळीमध्ये पशुसंवर्धन विभागाच्या कार्यशाळा आयोजीत करण्यात आली असून याच्या उद्घाटनप्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या.. या कार्यशाळेच्या माध्यमातून उद्योजक निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली