आज दिनांक २७ जून रोजी
सांगली मिरज कुपवाड मा_सहाय्यक_आयुक्त . सांगली. यांना शामराव नगर वाशीयाकडून निवेदन देण्यात आले त्याचा प्रमुख विषय-- पूर नियंत्रण पाणी निचऱ्यांसाठी सांगली महापालिकेच्या 596 कोटीच्या प्रस्तावित कामाच्या कार्यवाहीबाबतचा होता...
यामध्ये पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या..
कार्यसम्राटआमदार सुधीरदादा_गाडगीळ_यांच्या_सूचनेनुसार आम्ही सदरचे निवेदन देत आहोत व आमच्या मागण्यासंदर्भात माहिती देण्यात यावी.
पूर आपत्ती नियंत्रण अंतर्गत पूर व पावसाच्या साचून राहणाऱ्या पाण्याच्या निचरा होण्यासाठी सांगली महापालिकेच्या 596 कोटी रुपयांच्या प्रस्तावित कामांना शासनाच्या महसूल (आपत्ती व्यवस्थापन )विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
त्या बाबतचा शासन निर्णय जारी झाला असून शहरातील प्रमुख व प्राधान्याने पूर समस्याने घेरलेल्या शामरावनगर परिसरातील संपूर्ण भाग, कोल्हापूर रोड परिसर,आकाशवाणी परिसर, सुभाषनगर, रामनगर, गंगोत्रीनगर, कालिका नगर, रुक्मिणीनगर, लट्ठे सोसायटी, खिलारे कार्यालय परिसर,मदरसा परिसर, गादी कारखाना, विनायकनगर, विठ्ठलनगर, हनुमाननगर .या भागासाठी महापालिका प्रशासनाने पाणी निचाऱ्यांसाठी किती रक्कम उपलब्ध होणार आहे या संदर्भात संपूर्ण तपशील मिळावा.
तसेच उपलब्ध 596 कोटीच्या प्रस्तावित कामामधून प्रभाग 18 मध्ये पाणी निचाऱ्याच्या कामाचा आराखडा तयार केला आहे का, असेल तर तो मिळावा
. अशी मागणी या शिष्टमंडळाकडून करण्यात आली
या बाबत प्रशासनाने बुधवारी प्रभाग मधील नागरिकांनाहोणाऱ्या संभाव्य कामाबाबत सादरीकण करू व त्यांना सर्व ती माहिती देण्याचा शब्द दिला आहे..
या वेळी अमर पडळकर,भाजपा जिल्हाउपाध्यक्ष, राजू नलवडे, शहाजी भोसले, सुमित शिंदे,महिला मोर्च्या उपाध्यक्ष गीताताई जगदाळे, लालसिंग रजपूत, वरद पडळकर आधी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.