पालकमंत्री चंद्रकांत दादा यांना...यापैकी कोणीतरी आपल्याला वाहतूक कोंडी अतिक्रमणे तसेच गेल्या तीन-चार दिवसात चार मृत्यू या अपघातामुळे झाली आहे याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून व माध्यमातून आल्या आहेत .. सतीश साखळकर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पालकमंत्री चंद्रकांत दादा यांना...यापैकी कोणीतरी आपल्याला वाहतूक कोंडी अतिक्रमणे तसेच गेल्या तीन-चार दिवसात चार मृत्यू या अपघातामुळे झाली आहे याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून व माध्यमातून आल्या आहेत .. सतीश साखळकर


चंद्रकांत दादा तुम्ही आठवड्यातील काही दिवस मुंबई काही दिवस पुणे मग कोल्हापूर मग नंतर सांगली..
सांगली जिल्ह्यात नेमकं काय घडत आहे..


 जिल्हा प्रशासन , जिल्हा परिषद असेल, सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका असेल, जिल्हा पोलीस प्रमुख असतील ते त्यांच्या पद्धतीने आढावा घेऊन काम करत आहेत..
आणि सर्व प्रशासकीय अधिकारी हे सुद्धा सांगली शहरातच राहायला आहेत असे आमच्या ज्ञानानुसार माहिती आहे... त्यात काय बदल झाला असेल तर तो आम्हाला माहित नाही..


तुमच्याबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधी तुमच्या पक्षाचे तसेच तुमच्या मित्र पक्षांचे पदाधिकारी नेते तुमच्या बरोबर असतात ते पण आमच्या माहितीप्रमाणे बऱ्यापैकी सांगली मिरज शहरातच राहतात
यापैकी कोणीतरी आपल्याला वाहतूक कोंडी अतिक्रमणे तसेच गेल्या तीन-चार दिवसात चार मृत्यू या अपघातामुळे झाली आहे याच्या बातम्या स्थानिक वृत्तपत्रातून व माध्यमातून आल्या आहेत
तसेच गेल्या कित्येक महिन्यांपासून स्मार्ट मीटर बाबत गदारोळ चालू आहे नागरिक टाचा घासत आहेत
आपल्याला कोणीच सांगत नसेल का...? का आता ते प्रश्न कळायचे बंद झालेत..? जाणीवपूर्वक या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे असे आपल्या सरकारची धोरण आहे का..?

असा प्रश्न आता सांगली जिल्ह्यातील नागरिकांना पडत आहे
तसेच विरोधी पक्ष जिवंत आहे का हा पण खरा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही...
का बोलाचीच कढी व बोलाचाच भात असा सत्ताधारी विरोधकांचा मेळ दिसून येत आहे
बघूया तोंडावर महानगरपालिकेच्या तसेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत म्हणून तर सत्ताधारी व विरोधक जागे होतात का त्यासाठीचा हा प्रपंच
नाहीतर आपण सगळेजण मिळून आहोतच आपले शहर आहे आपला जिल्हा आहे आपणच काळजी केली पाहिजे

सतीश साखळकर
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा
Chandrakant Patil
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली. / Collector Office, Sangli.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली महाराजस्व अभियान
जिल्हा माहिती कार्यालय, सांगली / District Information Office, Sangli
Sangli Police
Sangli Police
Smkc Sangli


लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली. ________________________________________________   


            संपादकीय.....


चंद्रकांत दादा नमस्कार...

जसे सतीश साखळकर म्हणतात तशीच परिस्थिती सांगली शहरात आहे ..परंतु आपणास आमचे एकच सांगणं आहे..
सांगली मिरज कुपवाड शहरांमध्ये लोकवस्ती वाढलेली आहे ...कुठेही पार्किंगची सुविधा नाही... गल्ल्याबोळातून गाड्या ह्या रस्त्यावरच लागतात.. आणि त्याला उपाय पण नाही.. या आठवड्यात जे अपघात झालेले आहेत ते सर्व जड वाहने व बसेस यांचे झालेले आहेत... सांगली सारख्या गर्दीच्या ठिकाणी सुद्धा जड वाहने व बसेस शर्यत लावल्यासारख्या पळवल्या जातात......

     .. दादा... आपण लक्ष देणे गरजेचे आहे.... 

परवा अकारण हकनाक शर्वरी कुलकर्णी या तरुणीचा या शर्यतीमध्ये बळी गेला ...याला कोण जबाबदार.. तर आपण मंत्री म्हणून आरटीओ खाते, असेल सांगली जिल्ह्यातील ट्राफिक खाते असेल , किंवा  पोलीस डिपार्टमेंटला सक्त सूचना द्याव्यात... का तर सांगलीमध्ये जड वाहने बसेस व कार मोटार सायकली, कोणत्याही कायद्याचे पालन न करता सुसाट वेगात पळत असतात ...त्यामुळे जो पळत असतो त्याच्यापेक्षा समोर येणारा अकारण अपघातग्रस्त होऊन त्याचा जीव जातो हे नमूद करणे गरजेचे आहे..

आपला :सलीम नदाफ ; संपादक: लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली.
8830247886