ब्रेकिंग न्यूज ..... जत प्रतिनिधी अशोक सरगर ..
४० वर्षांची निष्ठा धोक्यात?
सोमनिंग चौधरी (साहेब) काँग्रेसवर नाराज...– उमदी जिल्हा परिषदेत मोठा राजकीय भूकंप!
सुसलाद गावचे सुपुत्र व गेली तब्बल ४० वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले ज्येष्ठ नेते सोमनिंग चौधरी (साहेब) हे सध्या काँग्रेस पक्षावर प्रचंड नाराज असल्याची खळबळजनक चर्चा जत तालुक्यासह संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उमदी जिल्हा परिषद मतदार संघ मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर स्वतःला किंवा कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळेल, या अपेक्षेवर असलेल्या चौधरी साहेबांच्या आशांवर पाणी फेरले गेल्याचे बोलले जात आहे.
👉 पुढील दिशा काय?
“आता साहेब काय निर्णय घेणार?” हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मात्र,
“योग्य उमेदवाराला पाठिंबा देऊ, अंतिम निर्णय साहेबच घेतील” असे संकेत दिले जात आहेत.
🔥 देव-पाण्यात ठेवले?
धक्कादायक बाब म्हणजे, सोमनिंग चौधरी यांना उमेदवारी मिळू नये यासाठीच काहींनी देव-पाण्यात ठेवले, अशा गंभीर चर्चा रंगत असून काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघडकीस येत आहे.
🎉 भाजपमध्ये आनंदाचे वातावरण
या साऱ्या घडामोडींचा थेट फायदा भाजपला होत असल्याचे चित्र असून उमदी जिल्हा परिषद मतदार संघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
❓ काँग्रेस–राष्ट्रवादीतील अंतर्गत गेम कोणाचा?
नेमका डाव कोण खेळतोय? पडद्यामागे कोण सूत्रे हलवत आहे?
या प्रश्नांवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू असून सोमनिंग चौधरी (साहेब) यांचा एक निर्णय संपूर्ण राजकीय समीकरणे बदलू शकतो, हे मात्र नक्की!
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

