लोकसंदेश न्यूज नेटवर्क
सांगली.
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वाचा करिश्मा! पाच महापालिकांत भाजप महायुतीची सत्ता, विरोधकांचा दारुण पराभव.
सांगलीचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री , तसेच भाजपचे प्रदेशातील ताकदवान नेतृत्व चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
सांगली–मिरज–कुपवाड, इचलकरंजी, कोल्हापूर, पिंपरी–चिंचवड आणि पुणे या पाचही महापालिकांमध्ये भाजप महायुतीने सत्ता काबीज करत विरोधकांचा अक्षरशः सफाया केला आहे.
सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासाठी या पाचही महापालिकांमध्ये सांगली महानगरपालिकेची ही निवडणूक प्रतिष्ठेची होती .सांगली महापालिकेत इतर सर्व पक्ष भाजपच्या विरोधात उभे होते, तरीही दादांनी सांगलीमध्ये संपूर्ण 78 जागांवर उमेदवार दिले होते आणि त्यांना सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ आणि मिरजेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांची साथ मिळाली आणि दादांचे मजबूत संघटन या कामी आले आणि आज सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणण्यात चंद्रकांत दादांना यश आले आहे.
सांगलीमध्ये चंद्रकांत दादांनी विकास कामांचा जो सपाटा लावला होता त्याचे परिणाम या निवडणुकीत दिसून आले. जनतेच्या मनात कसं शिरायचं हे चंद्रकांत दादांना पक्क ठाऊक आहे त्यामुळेच सगळे पक्ष विरोधात असताना सुद्धा चंद्रकांत दादांनी सांगली महापालिकेवर सत्ता आणलेली आहे यामध्ये चंद्रकांत दादांच्या राजकीय कौशल्याचा आणि नेतृत्वाचा करिष्मा दिसून आला.
या पाचही महापालिकांची संपूर्ण राजकीय जबाबदारी चंद्रकांतदादांनी स्वतः स्वीकारली होती. केवळ प्रचारापुरते नेतृत्व न करता, संघटनात्मक बांधणी, योग्य उमेदवारांची अचूक निवड, बूथनिहाय नियोजन आणि कार्यकर्त्यांना दिलेले बळ यामुळे हा विजय शक्य झाला आहे.
विशेष म्हणजे, विरोधकांना सर्व शक्ती एकवटूनही भाजपचा हा विजयरथ रोखण्यात अपयश आले. जनतेने विकास, पारदर्शकता आणि मजबूत नेतृत्वालाच मत देत विरोधकांच्या अपयशी राजकारणाला स्पष्ट नकार दिला आहे.
हा विजय म्हणजे केवळ महापालिका जिंकण्याचा निकाल नाही, तर
चंद्रकांतदादांच्या नेतृत्वावर जनतेने दिलेली विश्वासाची मोहोर आहे.
शहरी भागात भाजपचा वाढता प्रभाव आणि कार्यकर्त्यांची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे.
या निकालानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे
"जिथे चंद्रकांतदादा, तिथे विजय अटळ!"
पाचही महापालिकांमध्ये आता भाजपच्या माध्यमातून
विकासाला गती, भ्रष्टाचाराला लगाम आणि सक्षम प्रशासनाची नवी सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली.

