पोलिसांच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद, 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी नोंदवला सहभाग
नांदेड पोलिसांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मिळाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 100 पेक्षा अधिक कंपन्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. थेट मुलाखती आणि नियुक्त पत्र सुशिक्षित बेरोजगार तरुणांना देण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेच्या निकषानुसार 11 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश वेदपाठक यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पोलिस आणि तरुणांचा समन्वय राहावा, तरुण गुन्हेगारी व व्यसनापासून दूर राहून त्यांना नोकरी मिळावी यासाठी या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिली आहे.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली