शरद पवार नसते तर अजित पवार उपमुख्यमंत्रीही होऊ शकले नसते - वैभव नाईक
ON अनधिकृत मायनिंग
- कणकवली तालुक्यातील कासारडे गावामध्ये अवैध मायनिंग सुरू असून, याबाबत ग्रामस्थांची तक्रार दिली आहे. मात्र, याप्रकरणी नागरिकांना धमक्या येत आहेत
- या गावांमधील दोन ते अडीच हजार हेक्टरमध्ये बेकायदा वाळू उत्खनन सुरू आहे. पण याला महसूल विभागाचा पाठिंबा आहे
- तक्रार केल्यानंतर जो दंड झाला तो शासनाने अजून वसूल केलेला नाही
- ज्यांना दंड झाला त्यांनाच पुन्हा उत्खनन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत
- या सर्वांचा आका कोण आहे ? हाच प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे
- जिल्हाधिकारी व महसूल अधिकारी यांना भेटून सर्व पुरावे सादर करणार असून, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन उभारणार
- यामध्ये महसूल अधिकारी सामील असून, त्यांना देखील कोटींचा हप्ता पोच केला जातो. त्यामुळे हे अधिकारी त्या ठिकाणी जायला देखील बघत नाहीत. महसूल अधिकाऱ्यांच्या या संदर्भात लागेबंधे आहेत
- यासंबंधी लवकरच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे लक्ष वेधून ते जिल्हा दौरा करणार आहेत
ON संजय शिरसाट
- संजय शिरसाट यांना त्यांच्याच एका मंत्र्यांनी सांगितलं होतं. सत्तेत राहा नाहीतर बाहेर पडा ! शिरसाट यांना त्यांच्या खात्याबद्दल, समाजाबद्दल कोणताही स्वाभिमान नाही
- राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आपली मनमानी वेगवेगळ्या खात्यामध्ये करत आहेत. त्यामुळे सगळ्या खात्यांवर अन्याय होत आहे. बांधकाम, सामाजिक न्याय विभाग असू दे त्यामुळे अजित पवार यांच्या विरोधात कोणाची बोलण्याची हिंमत नाही
- संजय शिरसाट यांना खरा स्वाभिमान असेल तर त्यांनी आपल्या समाजाला न्याय न दिल्यामुळे राजीनामा द्यावा, ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे
- लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणूक पुरती होती, हे आता त्यांनी सांगितले आहे
- अजित पवार हे उपमुख्यमंत्री देखील होऊ शकले नसते, जर शरद पवार नसते तर !
- अजित पवार हे काल देखील उपमुख्यमंत्री झाले नसते जर त्यांनी शरद पवारांची गद्दारी केली नसती तर !
- मुख्यमंत्री पदापेक्षा उपमुख्यमंत्री कशामुळे झालो हे अजित पवार यांनी लक्षात ठेवावे
- विधानसभा निवडणुकीत आश्वासन दिली गेली पण त्याची पूर्तता झाली नाही
ON कर्जमाफी
- या सरकारात एखादा योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वजण धाव असतात. देवाभाऊंचे वेगळे बॅनर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वेगळे बॅनर, अनाथांच्या नाथा एकनाथांचे वेगळे बॅनर लागतात
- निवडणुकीमध्ये योजना बंद झाल्या की, हात वरती करतात. शेतकऱ्यांची कर्जमाफी, भोजनथाळी बंद, या सरकारने आठ पेक्षा जास्त योजना बंद केल्यात
ON स्थानिक स्वराज्य निवडणुका
- विधानसभेत वेगवेगळ्या फसव्या योजना आणल्यामुळे त्यांना सरकारमध्ये सामील होता आलं. त्यांना माहित आहे की, आपल्याकडे जनाधार आहे. त्यामुळे अजूनही सहा महिने निवडणुका होतील की नाही सांगू शकत नाही
ON उदय सामंत
- उदय सामंत हे आमचे चांगले मित्र आहेत. गेल्या अडीच वर्षात त्यांनी पक्ष बदलला त्यावेळीपासून ते मला सांगत आहेत. त्यावेळी पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबत होतो, आणि आताही आहे