LOKSANDESH NEWS
सोलापुरात पार पडलं राज्यातील पहिलं बौद्ध साहित्य संमेलन
सोलापूर शहरातील हुतात्मा स्मृती मंदिरात आज राज्यातील पहिले बौद्ध साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक,आंध्र आणि तेलंगणा राज्यातून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सामील झाल्याचं चित्र दिसून आलं. एकूण तीन सत्रात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
यामध्ये पहिल्या सत्रात श्रीलंकेतुन आलेले पूज्य भंते यश थेरो यांची धम्मदेसना,दुसऱ्या सत्रात विविध विषयावर परिसंवाद तर तिसऱ्या सत्रात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संमेलनात बौद्धगाय विहाराचा ताबा बौद्ध समाजाला मिळावा, सोलापूर विद्यापीठात डॉ. आंबेडकर विचारधारा केंद्र सुरु करावा असे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली