LOKSANDESH NEWS
मेहकर नगर परिषदेला आग, रेकॉर्ड रूम जळून खाक
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषदेला आज सकाळी आग लागण्याची घटना घडली. या आगीत नगर परिषद मधील महत्त्वाचे असलेले रेकॉर्ड रूम जळून खाक झाले. रेकॉर्ड रूम मध्ये महत्वाचे कागदपत्र होती. मात्र, आगीत संपूर्ण कागदपत्र जळून गेली आहेत.
सध्या मेहकर शहरातील अतिक्रमण मोहीम सुरू आहे. त्यामुळे आग लागल्याने चर्चेला उधाण आले आहे. आग लागल्यावर लोणार नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीत रेकॉर्ड रूम जळून गेले होते.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली