शाळेचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपये मंजूर, खासदार अजित गोपछडे यांची माहिती
आज अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संकलित महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद जिल्हा शाखेच्या वतीने अनेक शिक्षकांचा संघटनेमध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी राज्यसभेचे खासदार अजित गोचडे यांनी शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी मी प्रयत्न करत असून, तसेच शाळेच्या आत्याधुनिकी करण्यासाठी केंद्र सरकारकडून पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत ते लवकरच निधी वाटप याद्या झाल्यानंतर करण्यात येणार आहे.
यापुढे देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडावे याकडे लक्ष द्यावे असे आमदार हेमंत पाटील म्हणाले व यावेळी संघटनेमध्ये ज्यांनी ज्यांनी पक्ष प्रवेश केला आहे त्यांना सर्वांना खासदार व आमदार यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
लोक संदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई/ सांगली