साडेपाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी आणि सरपंच अँटिकरप्शनच्या ताब्यात

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

साडेपाच लाखांची लाच घेताना प्रांताधिकारी आणि सरपंच अँटिकरप्शनच्या ताब्यात

व्यावसायिकाला दिलेली नोटीस मागे घेण्यासाठी ११ लाख रुपयांची केली होती मागणी.

स्टोन क्रशर व्यवसायावरील कारवाई टाळण्यासाठी साडेपाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान ( वय ४०, मूळ रा. बीड) व फराळेचे सरपंच संदीप जयवंत डावर ( वय ४१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रविवारी रंगेहात पकडले.

तक्रारदार यांचा लिंगाचीवाडी (ता. राधानगरी) येथे स्टोन क्रशर व्यवसाय आहे. या उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्ते खराब होणे, धुळीचे प्रदूषण, घरांना भिंती जाणे असे त्रासदायक प्रकार घडत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आल्याने सदर व्यवसाय बंद करणेबाबत ग्रामपंचायत फराळे व राधानगरी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांनी नोटीस दिल्या होत्या.