लोकसंदेश न्यूज सातारा जिल्हा प्रमुख - ओंकार पोतदार
वाई सातारा रस्त्यावर पाचवड येथे दुचाकी ट्रक अपघातात पती पत्नी जागीच ठार
मांढरदेवीचे दर्शन घेवून घरी जात असताना काळाचा घाला मृत दांम्पत्य उंब्रज येथील आहेत. वाई सातारा रस्त्यावर पाचवड गावाजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालक व त्याच्या पाठीमागे बसलेली त्यांची पत्नी हे दोघीही अपघातात जागीच मृत्यू झाले. याबाबत घटनास्थळ आणि भुईंज पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की गुरूवारी दुपारी ३ वाजनेच्या दरम्यान मांढरदेवीचे दर्शन घेवून आपल्या उंब्रज गावाकडे दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्याची स्पेंल्डर दुचाकी नंबर
MH 50 H 6324 हि पाचवड गावानजीक रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या मालट्रक नंवर MH 10 CQ 6129 ला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेले पती पत्नी अपघातात जागीच मृत झाले
मृत सोमनाथ नानासो चव्हाण वय ४६ व त्यांची पत्नी रेखासोमनाथ चव्हाण वय ४० रा. लक्ष्मीनगर उंब्रज येथील असून त्यांच्या नातेवाईकांनी भुईज प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेह ओळखल्यानंतर रात्री उशीरापर्यंत शवविच्छेदनासाठी कार्यवाही सुरू होती. दरम्यान वाई पाचवड या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वारंवार दुरूस्ती व अतिक्रमणे काढुन रूंदावलेला हा रस्ता या अपघातानंतर पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडला आहे. या अपघाताची सखोल चौकशी भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे करीत आहेत. तर या अपघाताचा तपास पीएसआय विशाल भंडारे हवालदार आप्पासाहेव कोलवडकर करीत आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई / सांगली.