सांगली शहरातील तीन सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालयापैकी
कोणत्याही कार्यालयात दस्तऐवजाची नोंदणी करून घ्या
- मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाध
सांगली, दि. 22, (जि. मा. का.) : सांगली शहरामध्ये एकूण तीन सह दुय्यम निबंधक वर्ग-2 कार्यालये असून ही कार्यालये राजवाडा आवार सांगली,
तहसिल कार्यालय आवार मिरज आणि कवठेकर बिल्डींग उल्हासनगर, कुपवाड येथे कार्यरत आहे
तहसिल कार्यालय आवार मिरज
या कार्यालयांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार वरील तीन पैकी कोणत्याही कार्यालयामध्ये दस्तऐवजांची नोंदणी केली जाते.
जनतेने वरील तीन पैकी ज्या कार्यालयात दस्तऐवज नोंदवणेसाठी गर्दी होत असेल तर उर्वरित दोन पैकी कोणत्याही कार्यालयात आपल्या दस्तऐवजाची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग-1 व मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी केले आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड सांगली, मुंबई