उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगलीतील शिवसैनिक उतरले रस्त्यावर

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगलीतील शिवसैनिक उतरले रस्त्यावर


उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शविण्यासाठी सांगलीतील शिवसैनिक उतरले रस्त्यावर...

सांगली लोकसंदेश प्रतिनिधी ;

राज्यात कोणत्याही प्रकारचे राजकीय वादळ उठले असले तरी महाराष्ट्रातील शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे हे दाखवण्यासाठी सांगलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरले. 


    बुधवारी सकाळी येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली शहर प्रमुख महिंद्र चंडाळे, मयूर घोडके, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सुजाता इंगळे, माजी शहरप्रमुख अनिल शेटे, भगवानदास केंगार, अमोल कांबळे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. 

  
    यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती शिल्पाला हार घालून शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जयजयकाराच्या घोषणा देत कोणतीही बिकट परिस्थिती आली तरी शिवसैनिक मागे हटणार नाही. आम्ही पुन्हा नव्या उत्साहाने या आव्हानाला सामोरे जाऊ असे उपजिल्हाप्रमुख शंभुराज काटकर यावेळी म्हणाले.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई