महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप?? शिवसेना मध्ये फूट पडते की काय?? भाजपची खेळी यशस्वी होणार का??

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र मध्ये राजकीय भूकंप?? शिवसेना मध्ये फूट पडते की काय?? भाजपची खेळी यशस्वी होणार का??
BREKING NEWS
मुंबई;
सर्वात ब्रेकींग बातमी : ठाकरे सरकार ‘डेंजर झोन’मध्ये? एकनाथ शिंदेसह १३ आमदार भाजपमध्ये जाणार? सर्वांचा मुक्काम गुजरातमध्ये...

महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी आली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्यासोबत शिवसेनेतील १३ आमदार देखील आहेत असेही सध्या चर्चा आहे.

सध्या गुजरात येथे गेल्याची चर्चा आहे. कारण त्यांच्या फोनवर कॉल केल्यास गुजराती भाषेतील टोन ऐकू येत असल्याचे काहींचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ शिंदे गुजरात राज्यात सूरतमध्ये गेल्याची माहिती उघड झाली असून ते सूरतमध्ये नेमकं काय करतायत, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. एकिकडे विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ वाढल्याने शिवसेनेची धाकधूक वाढू लागली तर भाजपलाही सरकारला अस्थिर करण्यासाठीचं शस्त्र मिळालं.

त्यामुळे गुजरातमधील भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे सध्या हॉटेल ली मेरिडियन येथे मुक्कामी असून सोमवारी रात्रीपासूनच भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. एकनाथ शिंदेंनी 11 आमदारांसह बंड पुकारलं तर महाविकास आघाडी सरकार कोसळण्यास वेळ लागणार नाही असे जाणकाराकडून व्यक्त करण्यात येत आहे

शिंदेंसोबत हे देखील आमदार नॉटरिचेबल?
शहाजी बापू पाटील
महेश शिंदे सातारा
भरत गोगावले
महेंद्र दळवी
महेश थोरवे
विश्वनाथ भोईर
संजय राठोड
संदीपान भुमरे
उदयसिंह राजपूत
संजय शिरसाठ
रमेश बोरणारे
प्रदीप जैस्वाल
अब्दुल सत्तार

राजकीय घडामोडींना वेग! उद्धव ठाकरेंनी बोलवली शिवसेना आमदारांची तातडीची बैठक; ‘नॉट रिचेबल’ असणाऱ्या शिंदेंच्या उपस्थितीबद्दल संभ्रम
सर्व आमदारांनी या बैठकीला उपस्थित रहावे असे स्पष्ट निर्देश ‘मातोश्री’वरुन देण्यात आले आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई