लोकसहभागातून सांगलीला यलो सिटी बनविणार : महापौर सूर्यवंशी , आयुक्त कापडणीस यांचा निर्धार

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

लोकसहभागातून सांगलीला यलो सिटी बनविणार : महापौर सूर्यवंशी , आयुक्त कापडणीस यांचा निर्धार


लोकसहभागातून सांगलीला यलो सिटी बनविणार : महापौर सूर्यवंशी , आयुक्त कापडणीस यांचा निर्धार

क्रेडाई आपल्या सर्व प्रकल्पाना यलो टच देणार तर महापालिकेची कार्यालये आणि शाळा यलो रंगाने चमकणार : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांची माहिती मान्यवरांच्या हस्ते यलो सांगलीच्या लोगोचेही झाले लॉंचिंग 


सांगली : सांगलीच्या हळदीचे देश आणि राज्यस्तरावर ब्रॅण्डिंग व्हावे यासाठी सांगलीची ओळख असणाऱ्या हळदीचा रंग वापरून सांगलीला यलो सिटी बनवण्याच्या निर्धार महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी व्यक्त केला आहे. 

        सांगलीला यलो सिटी बनविण्यासाठी आणि यलो सिटीचे लौन्चिंग करण्यासाठी आज सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आणि इंजिनिअर्स आणि आर्किटेक्चर्स असोसियन कडून यलो सांगली याबाबतच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मनपा आयुक्त नितीन कापडणीस, उपमहापौर उमेश पाटील, स्थायी सभापती निरंजन आवटी, गटनेते विनायक सिंहासने, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, आभाळमाया फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौगुले, प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद परिख , क्रेडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे, राज्य उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते यलो सांगलीच्या लोगोचेही लॉंचिंग करण्यात आले. तसेच आयुक्त कापडणीस यांच्या संकल्पनेला पाठिंबा देत क्रेडाईकडून आपल्या सर्व प्रस्तावित प्रकल्पाना यलो टच देणार असल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी यलो सिटी संकल्पना नेमकी कशी अंमलात  येऊ शकते याबाबत प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी प्रेझेंटेशनद्वारे सर्वाना माहिती देत देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या यलो सिटी बाबतची माहिती सर्वाना दिली. यावेळी नगरसेवक विष्णू माने, अभिजित भोसले, नगरसेवक योगेंद्र थोरात , गोपाळ मर्दा, चेंबरचे अध्यक्ष शरद भाई शहा यांच्यासह अनेक एनजीओ प्रतिनिधी आणि हळद प्रेमींनी आपली मते व्यक्त केली. 

         यावर बोलताना आयुक्त नितीन कापडणीस यांनी यलो सांगली करण्या मागचा उद्देश विशद केला. सांगलीची ओळख हि हळदीची आहे. सांगलीची हळद देशातच नाही तर परदेशात सुद्धा जाते. त्यामुळे एव्हडी मोठी हळदीची पेठ असणाऱ्या सांगलीला हळदीचा रंग देण्याचा निर्णय आम्ही घेतला. हळदीच्या ब्रॅण्डिंगसाठी आणि हळदीला बाजारपेठ उपलब्ध व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेऊन हा प्रयत्न आम्ही करत आहोत. पहिल्या टप्प्यात महापालिकेची सर्व कार्यालये दर्शनी बाजूनी यलो केली जातील आणि मनपा शाळा सुद्धा यलो रंगाने चमकणार आहेत. महत्वाचे चौक, शहरात येणारे मार्ग आणि सार्वजनिक भिंती तसेच प्रसिद्ध इमारतींनासुद्धा यलो रंग देण्याचा मानस आहे. याचबरोबर सांगलीकर जनतेनेही  यलो सिटी अभियानात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करत सांगलीतील प्रत्येक घराची दर्शनी बाजू ही पिवळ्या रंगाने रानवून यलो सिटीच्या उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहनही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या चर्चासत्रात बोलताना सांगलीकर जनतेला केले आहे. यलो सिटीची संकल्पना अमलात आणुन  यलो सांगली तयार करून आपली सांगली देशातील आठवे यलो शहर म्हणून अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे आपल्या सांगलीची जागतिक स्तरावर सुद्धा यलो सिटी म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी समस्त सांगलीतील नागरिक, एनजीओ, सामाजिक कार्यकर्ते , बिल्डर आणि सर्वच घटकातील लोकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले.  

    या चर्चासत्रास जेष्ठ नगरसेवक शेखर इनामदार,  संजय कुलकर्णी, हरिदास पाटील,  अतिरिक्त आयुक्त संजीव ओव्होळ , उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, अग्निशमन अधिकारी विजय पवार, शहर अभियंता परमेश्वर अलकुडे , सहायक आयुक्त नितीन शिंदे,, उद्यान पर्यवेक्षक गिरीश पाठक, महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ. दिलीप पटवर्धन, दीपक चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.