कुंभोज(वार्ताहर) - विनोद शिंगे
कुंभोज तालुका हातकलंगले येथे खासगी सावकारी जोमात सुरू असून कर्जदार मात्र व्याजाने कोमात गेल्याचे चित्र दिसत आहे.खासगी भिशीच्या नावाखाली, तसेच काही स्वयंघोषित खाजगी सावकार गरजू कर्जदारांना मासिक दहा ते पंधरा टक्केने कर्जपुरवठा करतात. यांनी सदर कर्जदाराकडून वसुलीसाठी स्वतंत्र यंत्रणा काम करत काही ठिकाणी वसुलीसाठी महिलांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याचे चित्र दिसते, परिणामी सावकाराचा तगादा व वसुली महिलांचा त्रास यामुळे कर्जदार मेका कुटीला आला असून भीक नको पण कुत्रआवर अशी अवस्था झाल्याचे चित्र दिसत आहे.
परिणामी महिलावर्ग खाजगी सावकार की भरण्यासाठी सध्या इचलकरंजी परिसरातून काही खाजगी सावकारांची प्रतिनिधी सकाळी दिवस उजाडायच्या सुरुवातीलाच महिला मंडळाच्या बचत गटाच्या मीटिंग घेऊन त्यांना लागेल तेवढा पैशाचा पुरवठा करतात परिणामी तेवढ्याच पद्धतीने व्याजही वसुली करतात काही महिला खाजगी सावकारी किला कंटाळले असल्याचेही चित्र दिसत आहेत.
आठवड्याच्या हिशोबाने चौथ्या आठवडी कर्जदाराकडून ठरलेल्या टक्केवारी प्रमाणे व्याजाची रक्कम आकारली जाते. म्हणजेच दर २८ दिवसांनी सदर व्याजाची रक्कम आकारली जाते. यामुळे अनेक कर्जदार त्रस्त झाले आहेत. यातील अनेक सावकारांकडे कोणतेही अधिकृत परवानगी नाही. मागील दोन वर्षापासून लोक कोरोणामुळे आर्थिक अडचणीत असताना सदर सावकारी करनारे लोक मात्र व्याजाच्या रकमेसाठी तगादा लावताना दिसत आहेत. वाढती महागाई, कोरोना, सारखे जागतिक संकट यामुळे जनता आर्थिक संकटाचा सामना करताना दिसत आहे. अशे त्रस्त कर्जदार सावकाराच्या व मध्यस्थी च्या भितीने पोलीस ठाण्याकडे रितसर तक्रार करण्यास धजावत नाहीत. यामुळे खासगी सावकारी करणारे लोक चांगलेच फोफावले आहेत. परिणामी काही ठिकाणी गावाला कायदा सांगणारेच सदर सावकार कित असल्याचे चित्र दिसत आहे. अश्या सावकारी करणाऱ्या लोकांवर कायद्याचा अंकुश असने गरजेचे आहे. अशी चर्चा त्रस्त कर्जदारांकडून केली जात आहे.
* डबल व्याजाची मागणी*
काही बहाद्दर सावकार कर्जदाराने ठरलेल्या तारखेला व्याजाची रक्कम दिली नाही तर त्याच्या कडून डबल व्याजाची मागणी करतात. परिणामी भिशीची अथवा व्याजाची रक्कम भरायला एक मिनिट जरी वेळ झाला तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात दंड आकारला जातो. यामुळे घेतलेल्या रक्कमेपेक्षा दुप्पट-तिप्पट पैसे सावकाराला द्यावे लागत आहे. असेच काही चित्र पाहायला मिळत आहे.विनोद शिगे कुभोज