हिंगणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महा विकास आघाडीचे अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

हिंगणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महा विकास आघाडीचे अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड

हिंगणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महा विकास आघाडीचे अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड.


KOLHAPUR
कुंभोज लोकसंदेश वार्ताहर
 हिंगणगाव ता हातकलंगले येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी महाविकास आघाडीच्या अर्चना अभय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदासाठी एकच अर्ज दाखल झाल्याने सदर निवड बिनविरोध झाल्याची घोषणा निवडणूक अधिकारी पी डी मुसळे यांनी केली.


     हिंगणगाव येथे ग्रामपंचायतीवर सध्या महाविर देसाई अनिल पाटील, अजित पाटील गटाची सत्ता असून पार्टी नियमाप्रमाणे सर्वांना समान संधी देण्याचा निर्णय निवडणूक कालावधीमध्ये झाला होता त्या अनुषंगाने विद्यमान उपसरपंच स्वप्नील पाटील यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा सरपंच सौ शीला पाटील यांच्याकडे सुपूर्द केला होता.


 सदर राजीनामा ग्रामपंचायतच्या झालेल्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आला. सदर उपसरपंच पदासाठी महाविकास आघाडीकडून अर्चना पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. परिणामी ग्रामपंचायत मध्ये झालेल्या बैठकीत ग्रामविकास अधिकारी पी डी मुसळे यांनी उपसरपंच पदी अर्चना  पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली.
             सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ शीला पाटील ह्या होत्या.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी डी मुसळे ग्रामसेवक यांनी काम पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शीला पाटील, उपसरपंच स्वप्नील पाटील अर्चना पाटील,अभिजीत मुळे, पुष्पा खांबे,उत्तम माने, सुवर्णा कांबळे, अश्विनी जमादार ,ताजुद्दीन नायकवडी, पूजा देसाई उपस्थित होत्या.  यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून आपला आनंद साजरा केला. यावेळी हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे मत नूतन उपसरपंच सौअर्चना पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी नूतन उपसरपंच शिल्पा पाटील यांचा सत्कार महाविकास आघाडीचे गटनेते महाविर देसाई ,सुकुमार देसाई ,अनिल पाटील, अजित पाटील  पोलीस पाटील विजय पाटील, प्रदीप परांडेकर सरकार अभय पाटील तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.विनोद शिंगे कुंभोज