तारदाळ खोतवाडी येथील पाणिपुरवठा योजनेची चौकशी करा ; प्रविन केेर्ले

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

तारदाळ खोतवाडी येथील पाणिपुरवठा योजनेची चौकशी करा ; प्रविन केेर्ले

तारदाळ खोतवाडी येथील पाणिपुरवठा योजनेची चौकशी करा ; प्रविन केेर्ले 

KOLHAPUR

हातकणंगले : 
लोक 
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी: विनोद शिंगे
 कोल्हापूर जिल्हा परिषद येथे दिनांक २७  जून रोजी सकाळी दहा वाजल्यापासून अनिश्चित काळासाठी
भारत निर्माण नळ पाणीपुरवठा तारदाळ खोतवाडी योजनेचे मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अध्यक्ष अशोक चौगुले व सचिव पवन शिंदे याच्यावर शासकीय लेखा परिक्षन  व २० चे नुसार तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व  वसुली व्हावी तसेच 2020 ते 2022 चे दोन वर्षाच्या शासकीय ऑडिट न केल्यास येणाऱ्या 27 जून रोजी कोल्हापूर जिल्हा परिषद येथेअनिश्चित काळासाठी  उपोषण करणार असल्याची माहिती प्रविन केेर्ले यांनी दिली .

     
जिल्हा परिषद मध्ये वारंवार तसेच पंचायत समिती येथे अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही तसेच भेट देऊन ही त्यांच्यावर कारवाई न करण्याचे कारण काय आहे. चाळीस हजार लोकांचा पाण्याचा प्रश्न पाणीपुरवठा आज बंद पडलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार हे सर्व शासकीय अधिकारी आहेत. असाही आरोप त्यांनी केला
अंदाजे 2 कोटीच्या आसपास विद्युत बिल थकीत आहे व वसुली थकीत 90 लाख आहे.व आता पर्यंत झालेली वसुली 3 कोटी झाली आहे मग वसुली केलेला पैसा गेला कुठे याचाही हिशोब दयावा


      तसेच तारदाळ मधील काही ग्रामपंचायत सदस्य व खोतवाडीतील ग्रामपंचायतीने ही पाणी पुरवठा योजना चांगली आहे असा ठराव जिल्हा परिषद मुख्या अधिकारी यांना दिले आहेत तसेच तारदाळ  ग्रामपंचायती मधील काही ग्रामपंचायत सदस्य यांनी सह्या करून जिल्हा परिषदेकडे ही स्कीम चांगली असल्याचे सांगितले आहे यावरून असे लक्षात येते की भ्रष्टाचार करणाऱ्या पाठीशी तारदाळ मधील काही लोकं प्रतिनिधी जाणीपूर्वक तारदाळच्या जनतेचा वाटोळ करण्यास बसलेले आहेत असाही आरोप केेर्ले यांनी केला  .
           या साठीच २७ जून पासून अनिश्चीत काळासाठी उपोषनास बसणार असल्याची माहिती केेर्ले यांनी दिली.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई ,सांगली