पत्रकारांच्या वर कारवाई करणाऱ्या सर्व राष्ट्रांना व सत्ताधीशांना संयुक्त राष्ट्र संघाचा दणका...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

पत्रकारांच्या वर कारवाई करणाऱ्या सर्व राष्ट्रांना व सत्ताधीशांना संयुक्त राष्ट्र संघाचा दणका...पत्रकारांच्या वर कारवाई करणाऱ्या सर्व राष्ट्रांना व सत्ताधीशांना संयुक्त राष्ट्र संघाचा दणका...

पत्रकारांना लेखनाबद्दल तुरुंगात टाकू नये : संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रे : पत्रकार करत असलेले लेखन, ट्रीट किंवा त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडू नये, असे संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.अल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेसंदर्भात हे मत व्यक्त करण्यात आले. लोकांचे भाषण विचारस्वातंत्र्य जपले जावे. त्यांना कोणीही धमक्या देऊ नयेत, अशी अपेक्षाही संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली.

२०१८ साली धार्मिक भावना दुखावणारे ट्विट केल्याच्या आरोपांवरून मोहम्मद झुबेर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईबाबत गुटेरस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी म्हटले आहे की, सर्व लोकांचे भाषण व विचारस्वातंत्र्य जपले जाईल, याची
काळजी प्रत्येक देशाने घेतली पाहिजे. पत्रकारांच्या लेखन, वक्तव्याबद्दल त्यांना तुरुंगात धाडणे अयोग्य आहे. मोहम्मद झुबेर यांना झालेल्या अटकेबाबत एका पत्रकाराने दुजारिक यांना प्रश्न विचारला होता.

लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारीतेला गेल्या दहा वर्षात संपूर्ण जगात ग्रहण लागलेल आहे .. ज्या वेळी एखादी सत्ता येते.. त्यावेळेला मात्र त्या सरकार चे गुणगान गाण्यासाठी पत्रकारितेचा वापर करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे..आपल्या पाहण्यात आलेल् आहे की,
भारतामध्ये मधील मोठे टीव्ही चॅनल्स, मोठी वर्तमान पत्रे.. आपल्या देशाचा विकास , प्रगतीची गोष्ट न करता, फक्त सरकारच्या मांडीवर बसून ही गोदी मीडिया सरकार कसे चांगले आहे, सरकार किती छान काम करत आहे ,याच्यावर वारंवार या जनतेस आपल्या माध्यमातून प्रवचन करत असतात

सोनी टीव्हीच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांच्या "कौन बनेगा करोडपती" मध्ये या गोदी व चाटूकार मीडियाला बच्चन यांनी जोरदार चपराक लावलेली आहे

 ,2000 च्या नोटे मध्ये कशी जादुई चीप आहे ,आणि ती 120 मीटर जमिनीखाली जरी दडवली तरी ते सरकारला कळणार आहे ,असे काहीतरी बरळणारे पत्रकार व अशा  भ्रम निर्माण करणाऱ्या व बातम्या चालवणाऱ्यांची त्यानी जनतेसमोर चांगलीच पोलखोल केलेली आहे...

पत्रकारितेचं काम हे न्याय पद्धतीनं व्हायला पाहिजे.. जिथे चूक आहे तिथे चूकच .. तर ..बरोबर आहे ते तर बरोबरच म्हणायला पाहिजे ...परंतु अलीकडच्या काळात हा एक धंदा होउन बसल्याचे दिसून येत आहे ..मोठे उद्योगपती, मोठे धन दांडग्यानी या क्षेत्रामध्ये एक धंदा म्हणून प्रवेश केलेला आहे..

त्या मुळे ही माध्यमे आता सरकारची बाहुले बनून राहिलेली आहेत... त्यांना या देशाविषयी , जाती विषयी, धर्माविषयी अथवा कुठल्याही विकासाच्या विषयी कशाचे ही देणंघेणं नाही, आपल्या एका बातमीमुळे कुठे ही दंगे पेटू देत ,कुठेही विषमता निर्माण होऊ दे, याचा कधीही ही गोदी मीडिया,अथवा मोठी प्रिंट मीडिया विचार करत नाही, यांचे काहीं संपादक सत्ताधीशांच्या तुकड्यावर जगत असल्यामुळे त्यांच्या मांडीला मांडी लावून बसून त्यांचा उदो उदो करण्यातच यांचा दिवस जात असतो...

सरकारला यांनी कधीही विकास ,प्रगती याच्याविषयी प्रश्न
विचारलेले नाहीत.. परंतु जे जिवंत, प्रामाणिक पत्रकार आहेत यांना वारंवार त्रास देण्याचे काम सरकार मधून होत असल्याचे दिसून येत आहे ...पत्रकारितेमध्ये समाजाचे प्रबोधन , देशासाठीचा विकास, समाजाविषयी असणाऱ्या अडचणी दूर करण्याचे महत्त्वाचे काम असताना ही सर्व गोदी व दलाल मीडिया सरकारची दिवसभर टाळ वाजवत असते... परंतु हे बरोबर नाही


जरी मोठे टीव्ही ,मोठे वृत्तपत्र यांच्यावर यांनी कितीही अशा भ्रामक बातम्या दिल्या तरी....आता हा जमाना इलेक्ट्रिक मीडियाचा आहे ..त्यामुळे फेसबुक, व्हाट्सअप ,ट्विटर, युट्युब अश्या बऱ्याच माध्यमातून सत्य काय आहे हे जनतेला कळतच आहे ..परंतु या दलाल मीडियाला अजून हे ज्ञात नसाव ..एक आश्चर्यच मानाव लागेल ...ते म्हणतात ना "ए पब्लिक है ओ सब जानती है'' अशातला एक विषय आहे ..परंतु आता अशा दलाल मीडियावर जनतेने विश्वास ठेवण्याच बंद केलेल आहे ..


सरकार विरोधात मग ते कोणतेही असो, यांच्या विरोधात एखाद्या पत्रकाराने एखादी बातमी लावली किंवा बोलला तर त्याला लगेच अटकेची कारवाई करण्यापर्यंत मजल गेलेली आहे . तर याचा सर्व पत्रकारांनी ,दलाल पत्रकारांनी, गोदी मिडीयाने याचा विचार करायला पाहिजे... आज तुम्ही सुपात आहात उद्या जात्यात यायला वेळ लागणार नाही... याची निश्चित दखल घ्यावी....

या विषयी संयुक्त राष्ट्रांनी यात दखल घेतल्यामुळे हा विषय आता गंभीर होत चाललेला आहे...


सलीम नदाफ; सह,संपादक ,लोकसंदेश न्यूज मिडीया मुंबई.


लोकसंदेश न्यूज मिडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई