मी पुन्हा येणार'ची तयारी सुरु, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोष..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मी पुन्हा येणार'ची तयारी सुरु, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोष..



MUMBAI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी..

"मी पुन्हा येणार'ची तयारी सुरु, ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीसांसह भाजप नेत्यांचा जल्लोष


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं...


 एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचं सराकर अल्पमतात आलं होतं. त्यामध्येच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणी सिद्ध करा, असे निर्देश काढले. त्याविरोधात महाविकास आघाडीने कोर्टात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांचा आदेश कायम ठेवत उद्धव ठाकरेंना उद्याच बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवानात दाखल होणार आहेत.


उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली. फटाके वाजवून आणि पेढे वाटून भाजपकडून जल्लोष करण्यात आला. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार, अशा प्रकारचे ट्वीटसही येऊ लागले आहेत. राजभवनावर जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर ते राजभवनाकडे रवाना झाल्याचं समजतेय. कदाचीत गुरुवारी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊ शकतात. 

उद्या महाराष्ट्राचा जनतेची "उद्धव ठाकरे यांचा माफिया सरकार पासून मुक्तता होणार, असे ट्वीट भाजप नेते सोमय्या यांनी केले आहे. बहुमत गमावल्याची खात्री पटल्यानंतर देखील सत्तेच्या मोहापायी सर्वोच्च न्यायालयात गेलेले महाविकास आघाडी सरकार अपेक्षेप्रमाणे तोंडघशी पडले. वर्षा बंगला सोडताना मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला असता तर थोडी तरी अब्रू वाचली असती, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केलेय. तर  "मी पुन्हा येईन .....  नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ! असे ट्वीट महाराष्ट्र भाजपकडून करण्यात आल आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड,मुंबई.
*