मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.. शिवसेनेत बंड करणाऱ्यांचे बंड होणार थंड - चंदनदादा चव्हाण

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील आघाडी सरकारला कोणताही धोका नाही.. शिवसेनेत बंड करणाऱ्यांचे बंड होणार थंड - चंदनदादा चव्हाणMUMBAI

मुंबई : ता.२५, मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वा खालील आघाडी सरकारला कोणताही धोका नाही शिवसेनेत बंड करणाऱ्यांचे बंड होणार थंड - चंदनदादा चव्हाण प्रदेशाध्यक्ष : शिवसेना गुंठेवारी विकास समिती, महाराष्ट्र राज्य*

ज्यांनी शिवसेनेचे आमदारांना आमिष दाखवून शिवाय ईडीची भीती दाखवून बंड करायला भाग पाडण्याचे पाप करण्याचा उद्योग केला आहे तेच बाशिंग बांधून बसले आहेत मात्र इतर राज्यात यांनी हा फार्मुला वापरून सत्ता काबीज केली आहे त्यांनी महाराष्ट्रात अशी स्वप्ने यापूर्वी पाहिले आहे दुसऱ्या दिवशी सत्तेला उतावीळ झालेले बाशिंग काढून स्वतःचे हसू करून घेतले आहे हे महाराष्ट्राने पाहिले आहे.

या महाराष्ट्रात आमदार खासदार हे शिवसैनिकांमुळे आहेत त्यांच्या उद्रेकाचा अंत झाल्यास या महाराष्ट्रात शिवसैनिक मतदार संघात फिरकू देणार नाहीत. 
अजून ही बंड करणारे आमदारांना शिवसेनेचे दरवाजे उघडे आहेत झालेल्या प्रकारची त्यांनी पक्ष प्रमुख मा उध्दवजी ठाकरे साहेब यांची माफी मागावी तरच या राज्यातला शिवसैनिक शांत होईल.आता शिवसेना आक्रमक झाली असून आमच्या पक्ष प्रमुखांना त्रास देणाऱ्यांना शिवसैनिक जागा दाखवल्या शिवाय रहाणार नाही.

आम्ही शिवसैनिक पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या ठाम पाठीशी असून त्यांच्या आदेशाचे काटेकोर पालन करणार आहोत. बंडखोरांच्या अडचणी असतील ते त्यांनी मुंबईत येऊन पक्ष प्रमुखाना भेटावे. अन्यथा शिवसैनिक त्यांना माफ करणार नाहीत. त्यांची पळता भुई करुन ठेवल्या शिवाय राहणार नाही.

सांगली जिल्ह्यातील जिल्हा पक्ष प्रमुख मा आनंदाराव पवार बापू यांना संपर्क करून शिवसेना सोडू नये त्यांचे पक्षाला मोठे योगदान झालेले आहे. त्यांनी वरिष्ठना भेटून आपल्या तक्रारी बाबत निर्णय घ्यावा व पुन्हा पक्षात सक्रिय व्हावे अशी विनंती केली आहे.

राज्यात शिवसेना गुंठेवारी विकास समिती पक्ष पुन्हा मजबूत कारण्यासाठी राज्यभर दौरे आयोजित करून शिवसैकाना राजकीय सामाजिक ताकद देण्यासाठी सक्रिय रहाणार आहे..

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई. सांगली