शिवसैनिक आक्रमक ! बंडखोर आमदार तानाजी सावंत यांचे कार्यालय शिवसैनिकांनी फोडले,
PUNE
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत अनेक आमदारांना आपल्या सोबत घेऊन गुवाहाटी येथे गेले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे शिवसेनेचे आमदार गेले आहेत त्याच्या कार्यालयाची तोडफोड आता शिवसेनेने सुरु केली आहे. भूम – परंडा –वाशीचे आमदार तानाजी सावंत यांच्या पुणे येथील कार्यालयाची तोडफोड देखील शिवसेनेन केली आहे. पुण्यातील बालाजी नगर भागात असणाऱ्या तानाजी सावंत यांच्या कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवत तोडफोड केली आहे. यामध्ये तानाजी सावंत यांच्या कार्यालयाचे मोठे नुकसान देखील झाले आहेत.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली