KOLHAPUR
लोकसंदेश कुंभोज वार्ताहर विनोद शिंगे
भेंडवडे येथील जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था 19 मार्चच्या वादळवायात पाच खोल्या वरील पत्रे गेले उडून अद्याप परिस्थिती जैसे थे विद्यार्थ्यांचे नुकसान
हातकणंगले तालुक्यातील भेंडवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे इमारतीची पत्रे 19 मार्चला झालेल्या वादळी पावसात उडून गेली आहेत.तीन महिन्यानंतर ही पाच खोलीवरील पत्रे बसविले नाहीत.पत्रे बसवण्याचे काम मंद गतीने सुरू आहे. ठेकेदाराच्या दिरंगाईमुळे तीन खोल्यांमध्ये सात वर्ग सुरू आहेत, सात वर्गातील विद्यार्थी तीन खोल्यांमध्ये असल्यामुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. त्यातच भेंडवडेला पूर परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याने नदीची पाणी वाढल्यास ग्रामस्थांना या शाळेमध्ये स्थलांतर करणे अडचणीचे ठरणार आहे .भेंडवडे येथे जिल्हा परिषदेची 105 वर्षांपूर्वीची प्राथमिक शाळा आहे भेंडवडे विद्यामंदिरची चार वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र 19 मार्चला जोरदार वादळी वाऱ्यात नूतनीकरण केलेल्या शाळेमतीची छत उडाले, पत्रे उडून गेल्याने पाच वर्ग खोल्यांचे नुकसान झाले ग्रामपंचायतीने दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केला पण निधीमुळे हे काम रेंगाळले होते यातूनच स्थानिक प्रशासनाने पाठपुरावा केला नसल्याचा आरोप काहींनी केला आहे
दरम्यान दुरुस्तीसाठी निधी आला ठेकेदाराने साहित्य आणले पण संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे तीन खोल्यात सात वर्ग अशी स्थिती आहे, पाच वर्ग खोली वरील पत्रे बसवण्याचा उशीर होत आहे. त्याला पाऊस हे कारण दिले जात आहे. शालेय परिसरात चिखलमय झाला आहे विद्यार्थ्यांना दाटीवाटीने तीन खोल्यात बसवली जात असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे डासामुळे डेंगू मलेरिया लागण होण्याची शक्यता आहे त्यामुळे छताचे काम त्वरित पूर्ण करावी अशी मागणी ही ग्रामस्थातून होत आहे.
याबाबत सरपंच काकासाहेब चव्हाण म्हणाले की जिल्हा परिषदेकडे याबाबत पाठपुरावा केला आहे जिल्हा परिषदेच्या आकस्मिक विशेष फंडातून जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव यांच्या प्रयत्नातून साडेसहा लाख रुपये तसेच ग्राम पंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून पावणे तीन लाख रुपये निधी मंजूर केला आहे यातून काम सुरू आहे परंतु पावसामुळे काम संत गतीने होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते हर्षवर्धन चव्हाण म्हणाले की महापुराच्या भीतीने ग्रामस्थ भयभित आहेत विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी जागा नसल्याने शिक्षणाची हेळसांड होत आहे मुलांचे शिक्षण व आरोग्य सुद्धा धोक्यात आहे प्रशासनाने याबाबत गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली