सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी मंडळाचा धुव्वा .....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी मंडळाचा धुव्वा .....



SANGLI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी सांगली

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी शिक्षक समिती पुरस्कृत पुरोगामी मंडळाचा धुव्वा .....
 

विरोधी स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनेलचे 21 पैकी 20 उमेदवार निवडून आणून केला विक्रम...

 सत्ताधारी गटाचे कृष्णा पोळ हे एकमेव उमेदवार निवडून आले आहेत

 तर तब्बल बारा वर्षानंतर बँकेमध्ये झाले सत्तांतर.....


बँकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटाचे प्रत्येकी 21 आणि दोन अपक्ष असे 44 जण निवडणूक रिंगणात होते. शिक्षक समिती पुरस्कृत सत्ताधारी पुरोगामी पॅनेलला स्व. शि. द. पाटील (माधवराव पाटील) यांच्या शिक्षक संघाच्या गटाबरोबर शिक्षक भारती, खासगी प्राथमिक शिक्षक महासंघ, राज्य उर्दू संघटना, शिक्षक सहकार संघटनेने पाठिंबा दिला होता. विरोधी शिक्षक संघ ( थोरात गट) पुरस्कृत स्वाभिमानी शिक्षक मंडळाला संघाच्या शि. द. पाटील (धैर्यशील पाटील) गटासह जुनी पेन्शन संघटना, आदर्श शिक्षक समिती, दिव्यांग कर्मचारी शिक्षक 
संघटना, उर्दू शिक्षक भारती संघटनेसह बारा संघटनांनी पाठिंबा दिला होता. यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातीलही 1091 मतदान नोंद झाले होते.

सकाळ पासून सुरू असलेल्या मतमोजणीची दुपारी तीन वाजता पहिली फेरी पूर्ण झाली. पहिल्या फेरी अखेर स्वाभिमानी शिक्षक मंडळाच्या पॅनेलचे 21 जण सहाशे ते आठशे मतांनी आघाडीवर होते. दुसऱ्या फेरीमध्ये सोलापूर जिल्ह्याची मतमोजणी झाली. यामध्ये सत्ताधारी पॅनेलला जास्त मते मिळाली. सत्ताधारी पॅनेलला जास्त मते मिळूनही पहिल्या फेरीतील आघाडीमुळे विरोधी पॅनेल विजयी झाले. पहिल्या फेरीतील आघाडी बघूनच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मतमोजणी ठिकाणी आतषबाजी केली. विजयी घोषित झाल्यानंतर ढोलताशा व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

सोन्याळ मध्ये आनंद उत्सव..

सोन्याळचे सुपुत्र फत्तुसो नदाफ, उटगीचे सुपुत्र गांधी चौगुले व शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे यांच्यासह स्वाभिमानी पॅनेलच्या सर्व उमेदवारानी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत व ऐतिहासिक विजय मिळवल्याबद्दल सोन्याळ येथील शिक्षकानी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी शिक्षक नेते बसवराज बिराजदार सर, काष्ट्राईब संघटनेचे विभागीय कार्याध्यक्ष लखन होनमोरे, सिदांणा बिरादार सर, डी. एच. शिंगे सर, सिदांणा शिंगे सर, , अशोक मुचंडी सर, सुभाष कोळी सर, रामन्ना सनाळे पत्रकार, अनिल चौगुले, सिद्धू बिरादार, रफिक नदाफ यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारांना मिळालेली मते अनुसूचित जाती (जिल्हा राखीव) : किशोर कांबळे - 2384, अमोल माने 3044, विकास वायदंडे - 482. इतर मागास वर्ग : फत्तू नदाफ - 3282, सुरेश पाटील 2646, भटक्या जाती व जमाती विशेष - - मागास वर्ग : सचिन खरमाटे - 3138, सुरेश नरुटे 2786, महिला राखीव : रुपाली गुरव 3166, अनिता काटे 3102, प्रियांका पाटील 2654, रागिणी पाटील 2729. कडेगाव : संजय महिंद - 3226, राजू शेख - 2699. पलूस : नितीन चव्हाण - 3179, प्रदीप मोकाशी 2742. कवठेमहांकाळ : मनोज कोळेकर - 2705, अजित पाटील - 3214. शिराळा : अशोक घागरे - 3163, अरूण पाटील - 2764. आटपाडी : शरद चव्हाण 3212, हैबत पावणे - 2707. तासगाव : - श्रीकांत पवार - 2993, कृष्णा पोळ 3043, श्रीकांत शिंदे 2437, शब्बीर तांबोळी - 3121. वाळवा : शिवाजी जाधव - 3063, राहुल पाटणे - 3182, नीता पाटील - 2598, सुरेश पाटील - 2481, चंद्रशेखर क्षीरसागर - 268. खानापूर : धनाजी घाडगे 3039, संतोष जगताप - 3057, महेश शरनाथे -2901, राजाराम शिंदे -2699. जत : गांधी चौगुले - 3077, धरेप्पा कट्टीमणी - 2633, दयानंद मोरे -2696, विनायक शिंदे - 3173. मिरज : रामचंद्र देशमाने - 2710, कुबेर कुंभार - 2659, संगीता महाजन - 2535, मिलिंद नागणे - 3181, शामगौडा पाटील - 3035, अमोल शिंदे -3388.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली