विजयनगर ते हसनी आश्रम रस्त्याची दुरावस्था.... मोठमोठ्या खड्यानी वाहनधारक व नागरिक हैराण.... सांगली न्यायालयासमोरच दुर्गंधी.... प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

विजयनगर ते हसनी आश्रम रस्त्याची दुरावस्था.... मोठमोठ्या खड्यानी वाहनधारक व नागरिक हैराण.... सांगली न्यायालयासमोरच दुर्गंधी.... प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.....SANGLI 
विजयनगर ते हसनी आश्रम रस्त्याची दुरावस्था.... मोठमोठ्या खड्यानी वाहनधारक व नागरिक हैराण....
चक्क सांगली न्यायालयासमोरच दुर्गंधी....
प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष.....याबाबत अधिक माहिती अशी की,
सांगली जिल्हाधिकारी कार्यालगतच सांगलीचे जिल्हा न्यायालय आहे आणि जिल्हा न्यायालयाकडून जाणारा रस्ता हसनी आश्रम रस्ता.. हा रस्ता उपनगरामध्ये जातो सांगली मिरज रस्त्यास जोडला जाणारा हा रस्ता इतका अरुंद आहे की. . त्याच्या मधून दोन कार सुद्धा एकमेकास पास होऊ शकत नाहीत ,त्याच्यामध्ये परत पोलिसांनी बॅरॅकेट्स लावून या रस्त्याच्या कॉर्नरला अरुंद असणारा रस्ता परत अरुंद करून ठेवला आहे .. 


सांगली महापालिके हद्दीत येणा-या रस्त्याकडे सांगली महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याच् दिसते ..या रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या गटारीतून व प्लॉटमधील चिखलातून हा रस्ता पूर्ण बरबरटलेला असतो... त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना अक्षरशः कसरत करावी लागते ..न्यायालय कडून हसनी आश्रम जाणारा रस्त्यावर बरेच सरकारी अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी पण राहत आहेत... त्यांना मोटरसायकल वरून जाताना अक्षरशः आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे... याच्याकडे कृपया अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे  ...


  साडेतीन वर्षात या रस्ता दैनंदिन स्वच्छता याबाबतीत कोणतीच सुधारणा नाही .. या प्रभागातील नगरसेवकांनी या रस्त्याबाबतीत कोणतीच सुविधा पुरवली नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष प्रकाश मदने यांनी केली आहे.  
ते पुढें म्हणाले की,सिद्धिविनायक पतसंस्थेसमोरील प्रमोद चौगुले यांच्या घरापर्यंत चिखलाचे साम्राज्य पसरले आहे . दुचाकी चार चाकी गाडी घेउन जाता येत नाही ..नागरी सुविधा पुरवितात येत नसतील तर नगरसेवकानी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी मदने यांनी केली आहे...


 तसेच नियमित औषध फवारणी नाही, डासांचा फैलाव वाढला आहे , महापालिका नागरी सुविधांकडे लक्ष देत नाही ,त्यामुळे चक्क न्यायालयासमोरच नागरी वसाहत व झोपडपट्टीतील आरोग्य जीवन धोक्यात येऊ पाहत आहे...     
नागरी सुविधा मिळवण्यासाठी आयुक्तांनी लक्ष देणे ही आजची गरज असल्याचे सांगत जर नागरी सुविधांचा पाठपुरावा न झाल्यास वेळ प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली
येथे आंदोलन करण्याचा  इशारा काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष प्रकाश मदने यांनी  दिला आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली