मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन..एक सुवर्णसंधी.

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन..एक सुवर्णसंधी.




मच्छीमार व मत्स्यकास्तकारांना ई श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन

सांगली, दि. 29, (जि. मा. का.) : देशातील असंघटीत कामगारांना सुरक्षा फायदे देण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनामार्फत तयार करण्यात आलेल्या श्रम व रोजगार विभागाच्या पोर्टलवर मत्स्यव्यवसाय कामगार, मत्स्य विक्रेते व मत्स्यव्यवसाय अनुषंगीक कामाशी प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कामगारांनी नोंद करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय अमर पाटील यांनी केले आहे.



केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार विभागाच्या

https://register.esram.gov.in/#/user/self या पोर्टलवर संबंधित कामगारांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, बँकेचे तपशील इत्यादी माहितीसह मत्स्य कामगारांना स्वत: नोंदणी करता येणार आहे. तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी मत्स्यव्यवसाय, मत्स्यशेती क्षेत्रातील मच्छीमार व मत्स्यमुल्य साखळी इत्यादीमध्ये समाविष्ठ असलेले मत्स्यकामगार यांची वयोमर्यादा 16 ते 59 वर्ष असावी व जे Employees Stay Insurance (ESI) Employees Provident Fund Organisation (EPFO) हे सभासद नाहीत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSUs) व शासन सेवेतील कर्मचारी व आयकर भरणारे नसावे अशी पात्रता आहे.



पोर्टलमध्ये नोंदणी झालेल्या मत्स्यकामगारांना पुढीलप्रमाणे लाभ मिळतील. केंद्र शासनाने असे पोर्टल तयार केले आहे की, ज्यामध्ये असंघटीत मजूर, मच्छीमार, मत्स्यशेतकरी व मत्स्यव्यवसाय अनुषंगीक कामांमध्ये समावेश असलेल्या मजुर इत्यादीची एकत्रित माहिती आधारकार्डशी जोडून अपलोड करण्यात येते. जे कामगार या पोर्टलवर नोंदणी करतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत व्यक्ती मृत झाल्यास 2 लाख रूपये व कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 1 लाख रूपये देण्यात येणे शक्य होईल. असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा फायदे या पोर्टल मार्फत देण्यात येणे शक्य होईल. या पोर्टलवरील डेटाबेस, अचानक उद्भवणाऱ्या व राष्ट्रीय महामारी सारख्या परिस्थितीमध्ये सहाय्य करण्यासाठी वापरता येणे शक्य होईल.


अधिक माहितीसाठी ; सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) सांगली, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला कक्ष क्र. 108, विजयनगर, सांगली मिरज रोड सांगली येथे संपर्क साधावा.

लोकसंदेश न्यूज मिडीया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली