प्रसार माध्यमांनी दिलेली मोलाची साथ नेहमी हृदयाच्या कप्प्यामध्ये आठवणीच्या स्वरूपात राहील - डॉ. अभिजीत चौधरी

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

प्रसार माध्यमांनी दिलेली मोलाची साथ नेहमी हृदयाच्या कप्प्यामध्ये आठवणीच्या स्वरूपात राहील - डॉ. अभिजीत चौधरी



SANGLI 
प्रसार माध्यमांनी दिलेली मोलाची साथ
नेहमी हृदयाच्या कप्प्यामध्ये आठवणीच्या स्वरूपात राहील
- डॉ. अभिजीत चौधरी





लोकांशी निगडीत सेवा सक्षम, गुणवत्तापूर्ण व गतिमान करण्यावर भर देणार
- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

सांगली, दि. 29, : सांगली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार घेतल्यानंतर सुरूवातीपासूनच टंचाई, महापूर, कोरोनाची महाभयंकर स्थिती अशा परिस्थितीत काम करताना प्रसार माध्यमांनी दिलेली मोलाची साथ ही नेहमी हृदयाच्या कप्प्यामध्ये आठवणीच्या स्वरूपात राहीलच. परंतु या कारकिर्दीतले कामकाज भविष्यातील मिळणाऱ्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे भावपूर्ण उदगार सांगली जिल्ह्याचे मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी काढले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी व नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगलीच्या प्रसार माध्यमांशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी सर्वच माध्यमांचे संपादक, प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.


यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, फेब्रुवारी 2019 मध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक प्रकारचे चांगले काम करता आले. हे काम करताना सांगलीतील सर्वच घटकांनी अतिशय सकारात्मकपणे प्रतिसाद दिला. ही कामे करताना माध्यमांनी खूप सहकार्य दिले तसेच प्रेमही दिले. तर ज्या ठिकाणी चूक झाली ती दाखवून देण्याचे कामही प्रामाणिकपणे केले. शासनाच्या लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रसार माध्यमांनी जी मदत केली त्या माध्यमांविषयी खास कप्पा माझ्या हृदयात राहिला आहे. सर्वांचेच या कामी चांगले सहकार्य मिळाले. जिल्ह्यातील प्रत्येक कामात लोकप्रतिनिधींसह जनतेचेही सहकार्य लाभले. जिल्ह्याचा प्रमुख म्हणून काम करताना कोणताही दबाव कधीही जाणवला नाही, असे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, विकासाच्या दृष्टीकोनातून सांगावयाचे झाल्यास कोविडच्या काळामध्ये आरोग्य विभागाचे केलेले सक्षमीकरणाचे काम खूप समाधान देवून गेले. या कालावधीत लोकांच्या जिवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या काळात चांगली सेवा देता आली. याचेही खूप समाधान वाटते. 2019 च्या महापूराच्या पार्श्वभूमीवर व मिळालेल्या अनुभवावर 2021 मध्ये आलेल्या महापूराचा यशस्वीपणे सामना करण्यात यश मिळाले. ही आणखीन एक समाधानाची बाब होती. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ग्रामीण शालेय शिक्षण विभागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी माझी शाळा आदर्श शाळा व स्मार्ट पीएचसी यासाठी केलेले काम हे आठवणीत राहण्यासारखे आणि समाधान देणारे ठरले. भूसंपादन, निवाडे यातील कामे मनाला समाधान देणारी आहेत. दुष्काळ, महापूर, कोविड अशा विविध आपत्तीत महत्त्वपूर्ण काम करता आले. मेडिकल बॅक्रग्राऊंड असल्यामुळे ‍ कोविड काळात अत्यंत चांगले काम करता आले असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, लोकांशी निगडीत सेवा सक्षम, गुणवत्तापूर्ण व गतिमान करण्यावर भर देण्यात येईल. शहरातील सुरू असलेल्या विविध विकास कामांना गती देणार असल्याचे सांगून कामांची गती कमी होवू देणार नाही असे ते यावेळी म्हणाले.



जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे तेलंगणा राज्यातील असून ते 2014 बॅचचे IAS आहेत. त्यांनी यापूर्वी जिल्हा परिषद चंद्रपूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर महानगरपालिका उल्हासनगर येथे आयुक्त म्हणून काम केले आहे. उस्मानीया विद्यापीठातून त्यांनी वैद्यकीय डिग्री घेतलेली आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली