शिवसेना जिल्हाप्रमुखपदी सांगलीत पुन्हा आनंदराव पवार... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली निवड जाहीर...
MUMBAI /SANGLI
शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देऊन एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या आनंदराव पवार यांची मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेच्या सांगली जिल्हाप्रमुखपदी निवड केली.
महिनाभरात राज्यात झालेल्या सत्तानाट्याचा परिणाम जिल्हा शिवसेना संघटनेवरही झाला. सांगली जिल्हाप्रमुख इस्लामपूरचे नगरसेवक आनंदराव पवार यांनी एकनाथ शिंदे यांना उघडपणे समर्थन दिले. जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देत शिवसैनिकांवर होणारा अन्याय व विरोधी पक्षाकडून होणारी गळचेपी ही वस्तुस्थिती दाखवत आणि या सगळ्या अडचणींवर एकनाथ शिंदेच पदाधिकारी, शिवसैनिकांना न्याय देतील, या भावनेतून शिंदे यांना राज्यात पहिल्यांदाच संघटना पातळीवरील पहिला जाहीर पाठिंबा दिला. शिवसेनेच्यावतीने रोज कुणाची कायम तरी हकालपट्टी सत्र सुरू आहे, तर शिंदे यांच्याकडून दोन दिवसांपूर्वी ठाण्याच्या जिल्हा प्रमुखांची निवड केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत कायम असणारे निकटवर्तीय पवार यांनाच जिल्हाप्रमुख म्हणून जिल्हाभर जोमाने कामाला लागून संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याचे आदेश दिले आहेत.
तुमच्यासोबत आलेले तालुकाप्रमुख, जिल्हा उपप्रमुख व अन्य पदाधिकारीही कार्यरत राहतील आपापल्या विभागात संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतील असेही त्यांनी सांगितले. मुंबईत हॉटेल ट्रायडन्ट येथे झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी उदय सामंत व मान्यवरांच्या उपस्थितीत घोषणा करीत पुष्पगुच्छ देऊन पवार यांना शुभेच्छा दिल्या.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई,सांगली