आज गुरु पौर्णिमा ...गुरु विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस....
प्रत्येक व्यक्तीस मग तो कोणत्याही वयाचा असो... त्याच्या जीवनामध्ये त्याच्या चांगल्या आचरणासाठी कोणा गुरुची गरज असते ...आज त्यांच्या प्रित्यर्थ कृतज्ञता व सन्मान व्यक्त्त करण्याचा दिन..
गुरु फक्त शाळेतच असतात असं नाही .. आपल्याला पावलोपावली कोणी तरी जीवन संदेश देत असतो... मग तो शालेय जीवनात असेल.. व्यवसायिक वा प्रत्यक्ष जीवनात असेल ..त्या गुरुप्रत्यर्थ आपण ऋणी आहोत त्यांचा आज मान सन्मान करण्यासाठी गुरु पौर्णिमा उर्फ व्यासपौर्णिमा साजरी केले जाते ..
आज असाच एक गुरु शिष्यांचा कार्यक्रम सांगली शिक्षण संस्थेच्या दादू काका भिडे शिशुमंदिर, कै. सौ. जयंती वासुदेव गाडगीळ शिशु हॉल,राजवाडा परिसर सांगली येथे संपन्न झाला....
प्रथमतः सरस्वती पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली व व्यास गुरु यांच्या प्रतिमेस हार घालून
पूजन करण्यात आले..
सर्व मान्यवरांच्या सत्कारा नंतर या कार्यक्रमाची सुरुवात झाली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजाराम व्हनकंडे
यांनी प्रास्ताविकामध्ये
गुरु व शिष्याच्या नाते विषयीची व आदरभावनेची माहिती विषद केली .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार विजेते मुख्याध्यापक राजाराम व्हनकंडे सर तर सांगली शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन लिमये यांच्या
उपस्थितीत तर प्रमुख पाहुणे म्हणून तेजस बजरंग गवळी व सौ.सुनिता तेजस गवळी हजेरी लावली होती.
या कार्यक्रमामधे
वृषाली भट, अरुंधती कुलकर्णी,शिल्पा जोशी, स्वाती दिवेकर , सुरेखा शहा, स्नेहल पुराणिक,कीर्ती कुलकर्णी,मानसी शिदोरे, सारिका शिंदे, माधुरी गोंधळे व सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमास आपल्या पाल्यासह सर्व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता..
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली