वारकऱ्यांसाठी खूशखबर !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलबाबत घेतला मोठा निर्णय..

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

वारकऱ्यांसाठी खूशखबर !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलबाबत घेतला मोठा निर्णय..MUMBAI
लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी.

वारकऱ्यांसाठी खूशखबर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलबाबत घेतला मोठा निर्णय


नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.


जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे रवाना होत आहेत. आता ह्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या सर्व वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. 


त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे.

 यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई सांगली