सांगली येथील दस्तुरखुर्द सांगली मुख्यालयाच्या आवारातीलच चंदनाचे झाड कापून चोरांनी चोरून नेले होते...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली येथील दस्तुरखुर्द सांगली मुख्यालयाच्या आवारातीलच चंदनाचे झाड कापून चोरांनी चोरून नेले होते...SANGLI

सांगली येथील दस्तुरखुर्द सांगली मुख्यालयाच्या आवारातीलच चंदनाचे झाड कापून चोरांनी चोरून नेले होते...


            त्यामुळे सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली...

 पोलीस अधीक्षक श्री दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले मॅडम यांनी पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांना चोरी, घरफोडी, जबरी चोरी यांची माहीती घेवून आरोपींचा शोध घेवुन गुन्हे उघडकिस आणेणबाबत सुचना दिल्या होत्या....

 त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर शाखा गुन्हे अन्वेषण सांगली यांनी एक पथक स्थापन केले त्याप्रमाणे विश्रामबाग पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व सहा पो निरीक्षक प्रशांत निशानदार व पोलीस स्टाफ असे सांगली मिरज विभागात सांगली येथे झाले चंदन चोरीचे गुन्हयाचे अनुषंगाने गुन्हेगारांची माहीती घेत असताना संदीप पाटील, विक्रम खोत, संकेत मगदुम यांना गोपनिय माहीती मिळाली की,  दोन जण  वानलेसवाडी येथे पिशवित भरलेले चंदनाचे तुकडयांची विक्री करणेसाठी आले आहेत अशी माहीती मिळालेने विश्रामबाग पोलीस  ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील व सहा.पो. निरीक्षक प्रशांत निशानदार व पोलीस स्टाफ असे त्वरीत मिळाले माहीतीप्रमाणे जावुन पाहीले असता वानलेसवाडी येथे दोन जण हे संशयित रित्या पिशवी घेऊन थांबलेले दिसले त्या प्रमाणे त्यांचा संशय आलेने लागलीच छापा मारुन त्यांना ताब्यात घेतले त्यांची नावे अभिमन्यू  चंदनवाले व ....


                          रमेश चंदनवाले 

रमेश चंदनवाले राहणार मालगाव रोड मिरज येथील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले ,

अभिमन्यू चंदनवाले 

 त्यांचे कडे असले पिशवीमध्ये ४००० /- कि चे ३.१३८ ग्रॅम वजनाचे चंदनाचे कापलेले गाभ्याचे तुकडे मिळून आले, त्यांचे कडे चौकशी केली असता ते उडवाउडविची उत्तरे देवु लागले ... त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता गेले ४ दिवसापुर्वी विश्रामाबाग येथून रात्रीचे वेळी चंदनाचे झाड तोडून त्यातील चंदनाची आडके चोरुन नेले असलेचे सांगीतले. 


त्यावेळी  मिळून आले चंदन हे सविस्तर पंचनाम्याने सहा पो. निरीक्षक अमितकुमार पाटील, विश्रामबाग पोलीसठाणे यांनी सविस्तर पंचनाम्याने जप्त करून ताब्यात घेतले आहे. तसेच या दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले असून  गुन्हयाचा पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणेचे अधिकारी करत आहेत.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली