सांगली महापालिकेकडून सिंगलयुज प्लास्टिक विकणाऱ्यावर कारवाई सुरू : खणभागातील बेकरीला 5 हजाराचा दंड : मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार कारवाईला वेग.
SANGLI.
लोकसंदेश न्यूज सांगली प्रतिनिधी.
सांगली महापालिकेकडून सिंगलयुज प्लास्टिक विकणाऱ्यावर कडक कारवाई सुरू झाली आहे. यामध्ये खणभागातील बेकरीला प्लास्टिक हाताळणी बद्दल 5 हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे. मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशानुसार मनपाक्षेत्रात प्लास्टिक विरोधी कारवाईला वेग आला आहे.
सिंगल युज प्लास्टिकवर आजपासून बंदी..
नवी दिल्ली : एकदाच वापर (सिंगल यूज) होणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदीची अंमलबजावणी शुक्रवारपासून सुरु झाली आहे. राज्य सरकारांनी एकल वापर प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, वितरण, साठवणूक आणि विक्री क्षेत्रातील कंपन्या बंद करण्यासाठी अमंलबजावणी मोहीम सुरु केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले
शासन आदेशानुसार सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात सिंगल युज प्लास्टिक वापर , विक्री आणि हाताळणीस बंदी आहे. सिंगल युज प्लास्टिक पर्यावरणाला हानिकारक आणि घातक असल्याने सिंगल युज प्लास्टिक वापरणाऱ्या आणि विक्री करणाऱ्यांवर कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी प्रशासनाला दिले आहेत
.यानुसार महापालिकेचे सहायक आयुक्त नितीनकाका शिंदे यांच्यासह वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, प्रणिल माने, धनंजय कांबळे, गणेश माळी यांच्या पथकाने सांगलीत अनेक दुकानांची तपासणी केली. यावेळी खणभाग येथील लीला बेकरीमध्ये तपासणी केली असता या ठिकाणी सिंगल युज प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात असल्याचे निदर्शनास आले.
यावेळी पथकाने बेकरीतील पिशव्या पथकाने जप्त करीत बेकरी चालकाला सिंगलयुज प्लास्टिक हाताळणी केल्याबद्दल 5 हजाराचा दंड ठोठावला आहे. यापुढेही महापालिका प्रशासनाकडून अशाच प्रकारे कारवाई सुरु राहणार असून व्यावसायिकांनी आपल्या दुकानात बंदी असणारे सिंगल युज प्लास्टिकचा साठा करू नये किंवा त्याचा वापर करू नये अन्यथा संबंधित दुकानावर दंडात्मक कारवाई बरोबर फोजदारी कारवाई सुद्धा केली जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली