MUMBAI..महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

MUMBAI..महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक....MUMBAI
महागाईने बजेट कोलमडणार; 'या' कारणाने ग्राहकांना मिळणार वीज दरवाढीचा शॉक....

आगामी काही दिवसांमध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक बसू शकतो. वीज दरात वाढ होण्याची भीती (Power Tarrif Hike) असून त्यासाठी आयात करण्यात आलेला कोळसा कारणीभूत ठरू शकतो. औष्णिक वीज केंद्रामध्ये वीज निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 76 दशलक्ष टन कोळशाची आयात (Coal Import) होण्याची शक्यता आहे. असे झाले तर वीज दरात प्रति युनिट 50 ते 80 पैशांची दरवाढ होऊ शकते. त्याचा भार सामान्य ग्राहकांवर अधिक होण्याची भीती आहे.देशात मान्सूनचे आगमन झाले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मान्सूनचा अधिक जोर असणार आहे. या कालावधीत कोळशाचे उत्पादन आणि पुरवठा यावर परिणाम होतो. अशा स्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया कंपनी वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवठा सुरळीत राहवा यासाठी 15 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. तर, एनटीपीसी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनदेखील 23 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. त्याशिवाय, काही राज्यातील वीज निर्मिती कंपनी आणि खासगी वीज निर्मिती देखील 38 दशलक्ष टन कोळसा आयात करणार आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कोळशाची मागणी पूर्ण करण्यास सक्षम नाही. त्यामुळे कोळसा आयात करण्याचा निर्णय घेणार आहे.कोळसा आयात केल्याने वीज निर्मितीचा खर्च वाढणार आहे. देशात विजेची मागणी वाढली आहे. त्याअनुषंगाने देशात कोळशाचे उत्पादन वाढले नाही. मान्सून दरम्यान, उत्पादन आणि वाहतूक या घटकांवरही परिणामकारक ठरतात. देशात विजेचा संभाव्य तुटवडा लक्षात घेता कोळशाच्या आयातीचा निर्णय घेण्यात आला आहे.


देशातील वीज निर्मिती केंद्रात दररोज 2.1 दशलक्ष टन कोळशाचा खप आहे. सेंट्रल इलेक्ट्रिकसिटी ऑथिरिटी पॉवर प्लांट्समधील कोळशाच्या साठ्याची माहिती घेते. त्यानुसार, 19 जुलै रोजी वीज केंद्रात 28.40 दशलक्ष टन कोळशाचा साठा होता. तर वीज निर्मिती केंद्रात कोळशाची याच्या दुप्पट आवश्यकता आहे.

 लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली