Raygad: पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीची दुरावस्था मरणानंतरही मृतदेहाला भोगाव्या लागतात यातना... संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा...

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

Raygad: पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीची दुरावस्था मरणानंतरही मृतदेहाला भोगाव्या लागतात यातना... संतप्त गावकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा...



RAYGAD
लोकसंदेश रसायनी प्रतिनिधी : राकेश खराडे

पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीची दुरावस्था मरणानंतरही मृतदेहाला भोगाव्या लागतात यातना...


रसेश्वर मंदिरानजीकच्या पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीची अवस्था खुपच दयनीय झाली असून मृतदेहावर अंत्यसंस्कार करतानाही यातना भोगाव्या लागत असल्याचे चित्र दिसून येते.

रायगड जिल्ह्यातील रसायनी जवळील पाताळगंगा पुलाजवळची स्मशानभूमीची पत्र्याचे शेड गायब.....

पावसाळ्यात मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मृतदेहासह अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या नातेवाईक व ग्रामस्थ नागरिकांना पावसात भिजत उभे राहावे लागत आहे.



येथे ना पथदिव्यांची सुविधा आहे ना पाण्याची सुविधा. अंतिम संस्कार करण्याकरिता आलेल्या कुटुंबांना मृत व्यक्तीस अखेरचे पाणी पाजण्याकरिता इकडे - तिकडे फिरावे लागते.

या स्मशानभूमीवर खाने आंबिवली व नवीन पोसरी ग्रामस्थ अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह आणतात.सदर स्मशानभूमी या अगोदर एचओसी कंपनीने बांधून दिल्याचे समजते यानंतर या स्मशानभूमीकडे दुर्लक्ष झाल्याने स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था पहावयास मिळते
.

स्मशानभूमीचे बांधकाम जुने असल्यामुळे भविष्यामध्ये जीवितहानी झाल्याशिवाय राहणार नाही.रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्र असतानाही पाताळगंगा पुलाजवळील स्मशानभूमीची दुरवस्था सुधारण्यासाठी शासन गांभीर्याने दखल घेणार नसेल तर आम्ही ग्रामस्थ पुढील मृतदेहावर अंत्यसंस्कार एचओसी कंपनी गेटवर करणार असल्याचे खाने आंबिवली ग्रामस्थांनी बोलताना सांगितले.

आजूबाजूच्या परिसरातील संतप्त ग्रामस्थांचा इशारा
शासकीय अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींना या आजूबाजूच्या ग्रामस्थांनी एकच प्रश्न उपस्थित केला आहे की, अरे बाबांनो आम्हाला जिवंतपणी एवढी महागाई करून आपण मरण यातना दिलेल्या आहेतच.... त्या मरण यातना आम्ही भोगतच आहोत... परंतु आम्ही इहलोकी जाताना तरी किमान आम्हाला सुखाने तरी मरू द्या .... आमचे सर्व सोपस्कार व्यवस्थित पूर्ण होऊ द्यात....ही सर्व जबाबदारी शासनाची असताना शासनाने लोकप्रतिनिधींनी या प्रश्ना कडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे येथील ग्रामस्थांच्या चर्चेतून समजून येत आहे ....तरी या स्मशानभूमीचे पत्रे व पाणी, वीज ही सर्व व्यवस्था, आणि रस्ता त्वरित करून मिळावा... अन्यथा आजूबाजूच्या सर्व गावातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे समजते...
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई