RAYGAD पाटबंधारे खात्याचे अडमुठेपणाच्या धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला महिसदरा नदीला पुराच्या पाण्यामुळे खांडी गोवे,पुगांव शेतकऱ्यांच्या शेकडो एकर भातशेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी ....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

RAYGAD पाटबंधारे खात्याचे अडमुठेपणाच्या धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला महिसदरा नदीला पुराच्या पाण्यामुळे खांडी गोवे,पुगांव शेतकऱ्यांच्या शेकडो एकर भातशेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी ....



RAYGAD
लोकसंदेश रायगड प्रतिनिधी ; श्याम लोखंडे

पाटबंधारे खात्याचे अडमुठेपणाच्या धोरणामुळे बळीराजा मेटाकुटीला महिसदरा नदीला पुराच्या पाण्यामुळे खांडी गोवे,पुगांव शेतकऱ्यांच्या शेकडो एकर भातशेतीचे नुकसान, पंचनामे करण्याची मागणी ....




रायगड जिल्ह्यातील कोलाड पाटबंधारे खात्याच्या कारभारावर तालुक्यातील शेतकरी अनेकदा आक्रमक झाले आहेत त्यांच्या अडमुठेपणाच्या धोरणामुळे रोहा तालुक्यातील बळीराजा शेतकरी अक्षरशः आता मेटाकुटीला आला आहे. रोहा शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे भात पीक सोडाच परंतु खरिपाच्या पावसाळी पिक देखील शेतकरी घेऊ शकत नाही त्यांच्या अडमुठेपणाच्या धोरणांमुळे पावसाच्या पुराच्या पाण्याच्या धोक्याने आज शेकडो एकर लागवड केलेली गोवे पुगाव हद्दीतील भात शेतीचे पीक वाया गेले असल्याने तो आता मेटाकुटीला आला आहे त्यांचे तातकाल पंचनामे करावे अशी आग्रही मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांनी केेली आहे.
जिचे डोलवहाळ धरणातून उगम झाला आहे अशी रोहा तालुक्यातील गोवे गाव हद्दीतून बारमाही वाहणारी महिसदरा नदी आहे.मागील काही दिवस मुसळधार कोसळलेल्या पावसात सदरच्या नदीला पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने खांडी पडल्यामुळे पुराचे पाणी गोवे,पुगांव येथील शेतकऱ्यांच्या भातशेतीत जाऊन शेकडो एकर भात लागवड केलेल्या भातशेतीचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भातशेतीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी वर्गातून आता शासन दरबारी केली जात आहे.



गेली तीन ते चार वर्षा पासून महिसदरा नदीला प्रचंड मोठया प्रमाणात खांडी गेल्या असून याविषयी गोवे ग्रामस्थ व गोवे ग्रामपंचायत तसेच पुगांव ग्रामस्थ यांच्या कडून कोलाड पाटबंधारे खात्याकडे या खांडी भरण्यासाठी वेळोवेळी निवेदनाद्वारे अर्ज केला होता.गेल्या वर्षी पाटबंधारे खात्याकडून सदर खांडीत दगड गोटे,माती टाकुन, भरल्या गेल्या परंतु या निकृष्ट दर्जाच्या भरलेल्या कामामुळे या खांडी जोरदार होत असलेल्या पावसात तग धरू शकल्या नाही त्या पुन्हा जैसे थे उलट शासनाने तिजोरीतील खर्च केलेली लाखो रुपये रक्कम ही मातीत गेले असल्याचे बोलले जात आहे.
परिस्थिती कशी असली तरी त्याच्यावर मात करीत शेतकरी हा हजारो रुपये खर्च करून भातशेतीची पेरणी करून तो लागवड करत असतो.परंतु पाटबंधारे खात्याच्या अडमुठे पणाच्या धोरणामुळे पुराच्या पाण्यात ते क्षणात नष्ठ होऊन बळीराजावर उपासमारीची वेळ आली आहे पंचिवीस ते तीस वर्षा पूर्वी महिसदरा नदीवरील मूठवली पाटबंधाऱ्यावर उन्हाळी भातशेती केली जात होती परंतु बंधारा तुटल्यामुळे उन्हाळी शेतीकरणे बंद झाले.तद्नंतर रायगडचे लोकप्रिय खासदार सुनिल तटकरे तथा तत्कालीन कॅबिनेट मंत्री व पालकमंत्री यांच्या अथक प्रयत्नातुन नऊ वर्षांपूर्वी मुठवली हद्दीत पाटबंधारे खात्यामार्फत धरण बांधण्याचे काम केले.परंतु यातून शेतीला पाणी पुरवठा करणारे कालवे,व मोऱ्यांचे काम हे आजतागायत पाटबंधारे खात्याकडून अर्धवट अवस्थेत असल्याने याचा मोठा फटका पावसाळ्यात येथील शेतकऱ्यांना बसत आहे .



याबाबत गोवे ग्राम पंचायत व गोवे पुगाव ग्रामस्थ यांनी अनेकदा संबधित पाटबंधारे खात्याकडे या या बाबतच्या माहिती दिली तर कुणबी समाज नेते रामचंद्र जाधव यांनी शेतकरी बळीराजाचासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला त्यावर अधिकारी मंडळींनी कित्येकदा पाहणी केली मात्र आजपर्यंत येथील शेकर्यांच्या पदरी दगड गोटे हेच म्हणता येईल पूरपरिस्थितीत आमदार खासदार देखील याची पाहणी करतात परंतु त्यावर कोणत्याच उपाय योजना होत नसल्याचे दिसून येत आहे यामुळे अनेक वर्षापासून उन्हाळी भातशेती करणे बंद झाली आहे.तर चार ते पाच वर्षांपूर्वी महिसदरा नदीला गेलेल्या खांडीमुळे पुराच्या पाण्यामुळे भातशेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील उन्हाळी व पावसाळी या दोन्ही हंगामात होणारी भातशेती पूर्णपणे धोक्यात आली आहे तर काही दिवसापूर्वी तुफान पडलेल्या पावसामुळे भातशेतीत पुराचे पाणी शिरून पेरलेली रोपे कुजून गेली असून भातलावणी करता आली नाही यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली