या मराठी माणसामुळे टाटांनी गाडीला "सुमो" हे नाव दिलं !

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

या मराठी माणसामुळे टाटांनी गाडीला "सुमो" हे नाव दिलं !MUMBAI

या मराठी माणसामुळे टाटांनी गाडीला "सुमो" हे नाव दिलं !

टाटा सुमो हे नाव ऐकलं की कोणालाही चटकन वाटतं, की टाटांनी जॅपनीझ सुमो पहिलवानांशी साधर्म्य साधणारं आपल्या कारचं दणकट मॉडेल बनवलं म्हणूनच त्यांना टाटा सुमो हे नाव या गाडीला द्यावसं वाटलं असणार ... पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, टाटा सुमोंनी आपल्या या गाडीला हे नाव दिलं ते सुमंत मूळगावकर यांना त्यांच्या कंपनीप्रती असलेल्या निष्ठेच्या प्रित्यर्थ सन्मान म्हणून !

ही सत्यकथा खरोखरीच मोठी रंजक आहे.

टाटा मोटर्सचे अधिकारी दररोज जेवणाच्या सुट्टीत एकत्र जमून जेवत असत, पण त्यांच्यात कधीच सुमंत मूळगावकर जेवायला येत नसत. ते दररोज जेवणाच्या ब्रेकमध्ये आपली कार काढून कुठेतरी बाहेर जात असत आणि ब्रेक संपण्यापूर्वी ऑफीसमध्ये परतत असत. हा त्यांचा शिरस्ता जवळपास रोजचाच झालेला होता. त्यामुळे काहीजणांना तर असं वाटू लागलं होतं, की त्यांना बहुधा रोज कुठेतरी पंचतारांकीत रेस्तराँमध्ये टाटा डीलर्सकडून जेवणाचं आमंत्रण मिळत असावं आणि ते अशाच ठिकाणी जात असले पाहिजेत. 
एके दिवशी कंपनीतील काही अधिकाऱ्यांनी सुमंत यांच्या नकळत लंच ब्रेकमध्ये ते बाहेर पडताच त्यांचा 
पाठलाग केला आणि त्यांनी जे पाहिलं ते निव्वळ अविश्वसनीय होतं......

सुमंत मूळगावकर कोणत्याही पंचतारांकीत रेस्तराँमध्ये जात नसून ते दररोज हायवे लगतच्या एका ढाब्यावर जेवायला जात असतं. यामागे कारण हे की ढाब्यावर येणाऱ्या ड्रायव्हर्सशी त्यांना काही वेळ बोलायला मिळत असे.
 

    त्यांच्याशी बोलताना सुमंत त्यांना टाटा मोटर्सच्या ट्रकमधले गुणदोष विचारत असत, त्यांना हे ट्रक चालवताना येणाऱ्या काही समस्या ज्या कंपनीने सुधारल्या पाहिजेत त्यांबद्दलही ते चर्चा करून ते मुद्दे आपल्या जवळच्या एका डायरीत नोंदवून ते परत वेळेत ऑफीसमध्ये येत. 


हा जो फीडबॅक त्यांना मिळत असे त्यानुसार ते आपल्या कंपनीतील कामात त्याचा वापर करून अधिक सुधारणा करत असत. 
सुमंत यांच्या कामाविषयी जेव्हा कंपनीला हे कळलं त्यानंतर टाटा कंपनीच्या प्रती असलेली ही निष्ठा, कामाप्रती असलेला हा सच्चेपणा, हा प्रचंड उत्साह पाहून कंपनीने आपल्या या सच्च्या अधिकाऱ्याला सलाम म्हणून त्यांच्या नावाची अक्षरे घेऊन आपल्या गाडीला नाव दिले, टाटा सुमो (सुमंत मूळगावकर). 
सुमंत यांनी आपल्या कामातून एक नवा आदर्श रुजवला तसंच टाटा कंपनीनेही आपल्या कंपनीतील एका अशा प्रेरणादायी अधिकाऱ्याला निराळ्या पद्धतीने गौरवून जनमानसात आपले स्थान श्रेष्ठतम केले. 
कोण होते सुमंत मूळगावकर ....

सुमंत मूळगावकर हे एक सुप्रसिद्ध भारतीय उद्योजक होते. टाटा मोटर्सची स्थापना व वृद्धी करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते टाटा स्टीलचे वाईस चेअरमन आणि मारूती सुझुकीचे नॉन एक्सिक्युटीव्ह चेअरमन होते. 1 जुलै 1989 मध्ये ते हे जग सोडून गेले. भारत सरकारने त्यांना मरणोपरांत पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या स्मरणार्थ जमशेदपूरमधील टेल्को कॉलनीत सुमंत मूळगावकर स्टेडीयम उभारण्यात आले. मूळगावकर हे अतिशय नम्र, सुस्वभावी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात. ते स्वतः निसर्गप्रेमी होते तसंच त्यांना विविध कलांचीही आवड होती. त्यांनी सामाजिक कार्यातही भरीव योगदान दिलं. 

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली