सांगली जिल्ह्यातील वाहन चालकांवर एम. व्ही. अँक्ट ई चलान करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंडासाठी वाहनधारकांवर न्यायालयात खटला दाखलची कार्यवाही....

Hot Widget

Krushnakath News
Type Here to Get Search Results !

सांगली जिल्ह्यातील वाहन चालकांवर एम. व्ही. अँक्ट ई चलान करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंडासाठी वाहनधारकांवर न्यायालयात खटला दाखलची कार्यवाही....
SANGLI 
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली

सांगली जिल्ह्यातील वाहन चालकांवर एम. व्ही. अँक्ट ई चलान करण्यात आलेल्या कारवाईचा प्रलंबित दंडासाठी वाहनधारकांवर न्यायालयात खटला दाखलची कार्यवाही....सांगली जिल्हयामध्ये वाहतुक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर ई चलान डिव्हाईस मशीनद्वारे पेड व अनपेड़ अशा स्वरुपात दंडात्मक कारवाई करण्यात येते. सदयस्थितीत सांगली जिल्हयातील १२१०९२ वाहनधारकांवर २४४३७१ चलनाने ९,३५,९१,२५०/- रुपये इतका प्रलंबित दंड असुन प्रलंबित असलेल्या दंडाबाबत वाहनाचे चालक मालक यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडुन दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी होणा-या लोकअदालतीमध्ये वाहनधारकांना दंड भरणेबाबतच्या नोटीसा मोबाईल संदेशाद्वारे पाठविण्यात आले आहेत.वाहनधारकांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडुन ऑनलाईन नोटीसा पाठवुन देखील वाहनधारक त्यांचे वाहनांवर असलेला प्रलंबित दंड संबंधीत वाहतुक शाखेमध्ये जाऊन भरत नसलेचे निदर्शनास आले आहे. तरी वाहनधारक यांना आवाहन करण्यात येते की, ज्या वाहन चालक / मालक यांचे एम व्ही अॅक्टनुसार प्रलंबित दंड आहेत अशा वाहनधारकांनी आपले प्रलंबित दंड नजीकच्या वाहतुक शाखा किंवा पोलीस ठाणेमध्ये जाऊन दिनांक १२.०८.२०२२ रोजीपर्यंत भरणेच्या आहेत.


जे वाहन चालक मालक आपल्या असलेल्या वाहनावरील व मोबाईल वर प्राप्त झालेला मेसेज, तसेच लोकअदालतीच्या नोटीसानुसार त्यांचे वाहनांवर असलेला प्रलंबित असलेला दंड भरणार नाहीत, त्यांचेविरुध्द मा. न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे. तसेच प्रलंबित असलेल्या वाहनधारकांवर दाखल करणेत आलेले खटले हे न्यायालयातुनच निकाली करुन घ्यावे लागणार आहेत.


दिनांक- १३.०८.२०२२ रोजी प्रलंबित असलेल्या एम व्ही अॅक्ट ई चलनाचा व खटल्यांचा निकाल लोक अदालतीमध्ये विजयनगर न्यायालय सांगली येथे होणार आहे.

मा. श्री. दिक्षीत गेडाम, पोलीस अधीक्षक सांगली, मा. श्रीमती मनिषा दुबुले, अपर पोलीस अधीक्षक व मा. श्री. अजित टिके, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग सांगली यांचे आदेशानुसार ज्या वाहन चालक / मालक यांचे एम व्ही अॅक्टनुसार ई चलानचे दंड प्रलंबित आहेत, त्यांनी सदरचे प्रलंबित असलेले दंड भरावेत जे वाहनधारक त्यांचे वाहनावर असलेला प्रलंबित दंड भरणार नाहीत, त्यांचेविरुध्द मा. न्यायालयात खटला दाखल करणेची कार्यवाही चालु आहे.

तरी वाहनधारकांनी आपले वाहनांवर असलेला प्रलंबित दंड तात्काळ जवळचे वाहतुक शाखेस जाऊन भरावा, असे आवाहन प्रज्ञा देशमुख, नोडल ऑफीसर तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, सांगली यांनी केले आहे

लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली