SATARA
लोकसंदेश प्रतिनिधी संभाजी गोसावी
अनैतिक संबंधाच्या संशयावरून एकाचा खून पळशीतील घटना: म्हसवड पोलिसांत गुन्हा नोंद.
म्हसवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयांतून झालेल्या भांडणात कातकरी कुटुंबातील एकाचा खून झाल्यांची घटना शनिवारी दुपारी पळशी (ता.माण) येथील माण नदीच्या पात्रात घडली. या घटनेत कुशा चंदर जाधव (वय ४५ ) याचा मृत्यू झाला असून संशयित आरोपी बाळू गणपत जाधव यास म्हसवड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यात कुशाची पत्नी मंगल जाधव यांनी फिर्याद दिली असुन याबाबत म्हसवड पोलीसांनी अधिक माहिती अशी की गत दोन महिन्यापासुन ठेकेदार रविंद्र भगवान वाघमारे (रा. गायमाळ ता. सुधागड जि. रायगड) यांनी कुशा व मंगल जाधव यांना पळशी येथे कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी मजुरीने आणले आहे. सध्या हे दाम्पत्य शिंदे मळा येथे राहत आहे. त्यांच्या शेजारीच नातेवाईक बाळु गणपत जाधव व त्याची पत्नी सुभद्रा उर्फ भवरी बाळु जाधव (मूळ रा.पवनानगर ता.मावळ,जि.पुणे) राहतात.
बाळु जाधव ची पत्नी सौ सुभद्रा उर्फ भवरी हिच्याशी कुशा जाधव याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सुभद्रा व बाळू यांच्यात शनिवारी सकाळपासून वाद सुरू होता. यादरम्यान कुशा जाधव हा जेवन वाढून आणलेली भांडी देणेसाठी पळशी गावात जात असताना माण नदीच्या पात्रात बाळू व सुभद्रा यांच्या मारहाण सुरू केली होती.यावेळी कुशा जाधव भांडणे सोडविण्यास गेल्यावर बाळू जाधवने पत्नीबरोबर अनैतिक संबंध आहेत असे सांगून हातातील कुदळीने कुशा जाधव याच्या डोक्यात व इतरत्र मारहाण केली.
कुशा याच्या तोंडावरही वार करण्यात आले होते.तर जिभही कापली होती.कुदळीचा घाव वर्मी बसल्याने कुशा याचा जागीच मृत्यू झाला.खुनानंतर बाळू घटनास्थळावरून पसार झाला होता.त्याने मद्यपान केल्याचीही चर्चा ऐकायला मिळत होती.पोलिसांनी घटनेचे गंभीर्य ओळखून तात्काळ सूत्रे हलवून संशयित आरोपी बाळू जाधव याला ताब्यात घेतले.
या खुनाची माहिती समजताच मंगल जाधव हिने घटनास्थळी धाव घेतली.यावेळी रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेल्या पतीचा मृतदेह पाहून तिने हंबरडा फोडला या घटनेने माण तालुक्यात खळबळ उडाली असून अधिक तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे करत आहेत.
काही वर्षांपूर्वी पळशी येथेच कातकरी (कोळसे तयार करणारे) समाजातील एकाचा खून झाल्याची घटना घडली होती अशी कुजबुज परिसरातून ऐकायला मिळत होती.आजच्या या घटनेने संपूर्ण गाव हादरून गेल्याचे पाहायला मिळाले.
पळशी हे अधिकार्याचे गाव -
माण तालुक्यात राजकियदृष्ट्या संवेदनशील गांव म्हणुन काही वर्षापुर्वी पळशी या गावची ओळख होती ती ओळख येथील तरुणांनी खोडुन काढली आहे, सध्या या गावात जवळपास घरटी एकजण शासकीय सेवेत अथवा प्रशासनात अधिकारी आहे त्यामुळे सध्या या गावाची अधिकार्यांचे गाव अशी नवीन ओळख निर्माण झाली असुन, या अधिकार्यांच्या गावांत अशी घटना दुर्देवी असल्याचे बोलले जात आहे.
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई, सांगली