SANGLI
लोकसंदेश प्रतिनिधी सांगली
सांगली तालुका मिरज येथील हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतिक असलेले कसबे डिग्रज येथे मोहरम उत्साहात सुरू ...
कसबे डिग्रज : येथे मोहरमनिमित्त पंजे, नालपीर सावरींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. शनिवार चावडी व कोळीवाडी परिसर येथे भेटी सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी खोबरे खारीक व आबिराची उधळण केली.
परिसरात मोहरम हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो. यासाठी सर्वधर्मीय सहभागी होतात. सोमवारी मोहरमचा मुख्य दिवस, सायंकाळी नैवद्य, करबल, कार्यक्रम आहे.
मंगळवारी भेटी सायंकाळी ग्रामप्रदक्षिणा व सांगता
आलावा खेळणे असे कार्यक्रम होणार आहे. मंगळवारी (दि. ९) सकाळी ग्रामदैवत गैविसाहेब दर्गा परिसर येथे सवारींच्या भेटी, सायंकाळी ताशे, हलगी, कैताळ, घुमक्यांच्या वाद्यांत मिरवणुकीने सवारी ग्रामप्रदक्षिणा यानंतर मोहरमची सांगता होणार आहे
लोकसंदेश न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड मुंबई , सांगली